ते आपल्या धडाक्याने विजेचा लोट उत्पन्न करावयाचे आणि या विजेपासून प्रचंड कार्ये करून घ्यावयाचा त्यांचा मानस असे. टिळकांमध्ये गुणावगुण पराकाष्ठेला पोंचलेले होते. क्रांतिकारक लोकांस मध्यबिंदु माहीतच नसतो. पाऊल पाऊल जाणे त्यांच्या प्रकृतीस मानवत नाहीं; उड्या मारीत जोरानें जावें असेंच त्यांस वाटत असते. सर्वसाधारण जनतेस ते विचार करावयास अवसर देत नाहीत आणि जनतेसही चालढकल रुचत नाही. लोकांमध्ये विकार असतात आणि या विकारांस नवीन विचारप्रवर्तक आपल्या कार्यार्थ प्रवृत्त करीत असतात. अशा लोकांपैकीच टिळक होते. टिळक यांचा राज्यकर्त्यावर थोडासुद्धा भरवसा नव्हता. राज्यकर्ते परकी; स्वतःची तुंबडी भरण्यासाठी आलेले; कोणीही परकी अधिकारी येवो तो बहुतेक आपल्या वळणावरच जावयाचा असा त्यांचा सिद्धांत असे. यामुळे या कपटी सरकाराशी आपणही कपटीच बनले पाहिजे; सरकारच्या सर्व कृत्यांकडे डोळ्यांत तेल घालून पाहिलं पाहिजे; हें सरकार बंडासारख्या मार्गानी मुद्धां उलथतां आलें तरी तें क्षम्य व न्याय्य आहे. अमुक शत्रु ना? मग त्यास चिरडण्यास मागेपुढे पाहूं नये. श्रीकृष्णाचा भारतांतील उपदेश असाच आहे. शिवाजी, रामदास या सर्वास असेंच वागावे लागले. असे वागांवे तेव्हांच दास्यमग्न लोकांचा निभाव लागतो. ज्याच्या अंगांत नैतिक व आत्मिक सामर्थ्य रोमरोमांत भरलेले आहे असे सर्व राष्ट्र निर्माण होणे शक्य नाही. असे सांगणारे लोक, मानवी स्वभावाचे स्वतःचे अज्ञान मात्र दाखवितात. आशियांतील लोकांत जेव्हां वीरवृत्ति जोरावेल, तेव्हांच पाश्चात्यांच्या अधिकारलालसेस आळा पडेल. याच्या अगरी उलट नेमस्तांची विचारसरणी होती. आपण आधी स्वतःस सुधारले पाहिजे. ज्या गुणाच्या अभावामुळे आपले राज्य गेले ते गुण पूर्णपणे अंगी बाणल्याविना आपले राष्ट्र स्वत्व टिकवूं शकणार नाहीं. त्याखेरीज बंडासारखे उपाय शक्य नाहीत. आपण संघटना करूं या; भ्रातृभाव दाखवूं या; उद्योगधंदे, नीतिमत्ता या सर्वात प्रगति करूं या. सरकारास अमुक एक द्या असे सांगतांना जे मिळेल ते राखण्याची व झेंपण्याची पात्रता आपल्या अंगांत असली पाहिजे. रानडे, गोखले यांस खरोखरच वांटे की आपल्या लोकांची नैतिक अधोगति झाली आहे गोखल्यांच्या प्रत्येक व्याख्यानांत या गोष्टीवर जोर असे. रानडे म्हणत, 'Politics is not mere petitioning
पान:ना. गोखले चरित्र.pdf/२५७
Appearance