त्रास होत असे याविषयीं एकदां ते अमृतबझार पत्रिकेच्या संपादकांजवळ सहज बोलले; "मला बिलकुल विश्रांति मिळत नसून या कमिशनांतील माझ्या प्रतिपक्ष्यांशी कसे झगडावे हाच विचार रात्रंदिवस माझ्या डोळ्यांपुढे घोळत असतो. माझे प्रतिपक्षी पुष्कळ असून त्यांना तोंड देणारा असहाय असा मी एकटाच आहे. या कमिशनचे काम पूर्ण होईपर्यंत मी जगेन असे मला वाटत नाहीं. तरी माझें कर्तव्य मला करावयाचे असून त्यांत मला मरण आले तरी पतकरेल" १९१३ च्या पूर्वार्धात हिंदुस्तानांतील निम्मे काम संपवून कमिशन आक्टोबरमध्ये लंडन येथें भरत असे. इंग्लंडमध्यें काम चालले असतां तिकडे यूनियन सरकारने फक्त स्त्रियांवरची डोईपट्टी उठविली, परंतु नवीन कायद्यानें प्रतिवर्षी स्त्रियांस परवाना काढावा लागेल असे ठरविण्यांत आले. एवंच या डोईपट्टीऐवजी दुसरा कर आला. ही बातमी विजेसारखी सर्वत्र पसरली. गोखले चकले! त्यांची मुत्सद्देगिरी फोल ठरली!! वसाहत- सरकारच जगांत शहाणे ठरले. ढोंगी आणि आपमतलबी वसाहत सरकारने गोडीगुलाबीनें गोखल्यांस भुलवून थापेबाजी केली. १९१३ च्या एप्रिलमध्यें यूनियन सरकारनें आपल्या पार्लमेंटपुढें वर सांगितलेल्या नवीन कायद्याचे बिल पुढे आणले. या नवीन बिलानें गांधी आणि गोखले या द्वयास दिलेली वचनें मोडण्यांत आली. बायकांवरील तीन पौंड तेवढे नाहीसे करून ते भरून काढण्याची नवीन शक्कल त्यांनी काढली होती. आफ्रिकेतील हिंदी पुढाऱ्यांनी गोपाळरावांस विलायतेंत तार करून विचारले की, "फक्त स्त्रियांवरचीच डोईपट्टी नाहींशी करण्याचें तुम्ही अभिवचन घेतले होते काय?" गोखल्यांनी उत्तर दिलें "हा कायदा संपूर्णपणे रद्द करण्यांत येईल असें वचन मला मिळालें होतें." परंतु यूनियन- सरकार कांहींच खुलासा करीना. 'मौनं सर्वार्थसाधनम्' हेंच चांगलें असें त्यानें जाणलें! गोखल्यांचें म्हणणें खोडून काढण्याच्या भरीस न पडतां आपला कार्यक्रम त्यांनी सुरू ठेविला. बर्कचा उपदेश त्यांस कसा रुचणार? बर्क म्हणे, "That Asiatic nations have rights and that Europeans have obligations, that a superior race is bound to observe current morality of the time in all its dealings with its subject race." परंतु या उपदेशाचें या निगरगट्टांस काय होय?
पान:ना. गोखले चरित्र.pdf/२२६
Appearance