वचन मोडण्याचा त्यांचा अव्याहत क्रम होता. जे नीतिज्ञान हिंदुस्तानांत दाखविण्यांत येत असे तेच प्रचलित व परंपरेनें पवित्र गणलेले वचनभंगाचे नीतितत्त्व वसाहतवाल्यांनीही पूर्णपणे अंमलांत आणले.
गोखल्यांशी संवाद करून लॉर्ड ॲम्प्टहिल यांनी लॉर्डांच्या सभेत मोठें जोरदार भाषण केलें. परंतु वसाहत सरकार शिरजोर! त्यास या भाषणानें थोडीच आंच पोचणार आहे? त्यास तंबी कोण देणार? गांधींनी तडजोड करण्याचा प्रयत्न केला. मुदतबंदीची मुदत संपल्यानंतर तरी हिंदु मजुरांस स्वतंत्रपणे येथे राहावयास मिळाले पाहिजे. जे लोक आजपर्यंत येथे आहेत त्यांचे हक्क हिरावून घेणे अन्याय्य होय. येथे हिंदु लोक थोडे तरी राहणारच. त्यांच्या मानसिक, नैतिक, धार्मिक, व शैक्षणिक सुधारणेसाठी, तुम्ही काडीचाही प्रयत्न न केल्यामुळे, हिंदुस्तानांतून शिक्षक, व धर्मोपदेशक येथे आणण्यास परवानगी पाहिजे. या मागण्या रास्त होत्या. परंतु यूनियन सरकारच्या डोळ्यांवर संपत्तीचा व सामर्थ्याचा धूर चढलेला! कोणचीही मागणी त्यांस पसंत झाली नाहीं. १३ जून १९१३ रोजी यूनियन- सरकारने आपले नवीन बिल मूळ स्वरूपांत पसार केले. आफ्रिकेतील या मदोन्मत्त मतंगजास ताळ्यावर- वठणीवर कोण आणणार? तो कोणास बधणार? आशियाटिक लोकांस आपल्या पायांखाली तुडवीत तो मोठ्या गर्वाने चालला होता.
शेवटी पुनः गांधींनी १२ सप्टेंबर १९१३ रोजी सत्याग्रहाचे शिंग फुंकले. १२ सप्टेंबर रोजी खाणींतील मजूर संप पुकारणार असें स्मट्स साहेबांस गांधींनी कळविले. लोकांचे थवेच्या थवे संप पुकारीत चालले. अंगभर धड वस्त्र नाहीं, पोटास गोळाभर अन्न नाहीं, अशा मजुरांची शांति-सेना न्यू कॅसल येथील मैदानावर तळ देऊन होती. गोखले हिंदुस्तानांत जागृति करण्यासाठी ताबडतोब तेथील काम सोडून आले. त्यांनी गांधींस एक वर्षपर्यंत दरमहा ३०००० रुपये पाठविण्याचे ठरविलें होतें. पहिल्या महिन्यास ही रक्कम भरपूर पाठवितां आली नाहीं. परंतु गोखल्यांनी जंगजंग पछाडले आणि गांधींस पैशाची ददात भासू दिली नाहीं. सतत परिश्रमानें ३-४ लाख रुपये गोळा केले. केवढे हें लोकोत्तर कार्य! व्हाइसरॉयांची गांठ घेऊन गोखल्यांनी आपल्या कार्यास त्यांचीही सहानुभूति मिळविली.
पान:ना. गोखले चरित्र.pdf/२२७
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७
गांधी पुनः सत्याग्रह पुकारतात.