शकते. ह्यास्तव माझ्या भावि सुधारकांनो! माझ्या भावि स्वदेशभक्तांनों! तुमच्या अंतःकरणास स्वदेशाबद्दल तळमळ लागली आहे काय? देवांचे आणि ऋषींचे कोट्यवधि वंशज जवळजवळ पशूंच्या पंक्तीला जाऊन बसले आहेत, याबद्दल तुमचें अंतःकरण विदीर्ण होऊन जातें काय? देशांतील लक्षावधि लोक भुकेनें मरत आहेत; शेंकडों वर्षांपासून क्षुधापीडेमुळे तळमळत आहेत, हें पाहून तुमचें अंतःकरण कळवळून जातें कां? आकाशांतील एकाद्या कृष्णवर्ण मेघाप्रमाणे जिकडे तिकडे अज्ञानांधकार पसरला आहे. याबद्दल तुमचें अतःकरण तिळतिळ तुटतें कां? या चिंतेमुळे तुम्हांला झोप येईनाशी झाली आहे कां? तुम्हांला क्षणभरसुद्धां विश्रांति मिळेनाशी झाली आहे कां? ह्या शोचनीय स्थितीचा विचार तुमच्या रक्तांत भिनून जाऊन रक्तवाहिन्यांतून वाहू लागला आहे कां? हृदयाच्या प्रत्येक ठोक्याबरोबर तुमच्या अंतःकरणांतील चिंतनाचे विचार समानगतीनें वाहू लागले आहेत का? या निदिध्यासामुळे तुम्ही जवळ जवळ वेडे बनलां आहां कां? आपल्या भोवती पसरलेले दुःख हृदयांत भिनून जाऊन आपले नांव, कीर्ति, बायकामुलें, संपत्ति, इतकेंच नव्हे तर आपली शरीरें यांच्याबद्दल तुम्हांला अजीबात विस्मरण झालं आहे का? अशी स्थिति होणें ही स्वदेशभक्तीची पहिली पायरी आहे.' गोखले ही पहिली पायरी चढून वर गेले होते. सरोजिनीच्या नवीन संदेशाने त्यांना नव चैतन्य प्राप्त झाले. नंतर कांही वेळाने ते सरोजिनीस म्हणाले Stand here with me, with the stars and hills for witness and in their presence consecrate your life and your talent, your song and your speech, your thought and your dream to the mother-land. O poet, see visions from the hill-tops and spread abroad the message of hope to the toilers in the valleys,' सायंसमय होऊन शेवटचा रक्तिमा आजूबाजूच्या टेकड्यांवर पसरला होता. तो कमी होऊं लागून तारे चमकूं लागले होते. अशा प्रशांत, गंभीर प्रसंगी दशदिशांस व तारकासमूहास साक्ष ठेवून गोपाळरावांनी सरोजिनीस आपले तनमनधन देशास अर्पण करण्यास सांगितले. सृष्टीच्या वैभवापासून प्राप्त होणारे दिव्य संदेश, दऱ्यांखोऱ्यांतून अंधारांतून अडखळत चाचपडत जाणाऱ्या कार्यकर्त्यास सांगण्यास त्यांनी
पान:ना. गोखले चरित्र.pdf/२१५
Appearance