Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४
गोखल्यांचा आजार व सरोजिनीबाईची भेट.

तरी त्यांच्या उद्योगी स्वभावानुसार, हा लेख वाच, तें स्फुट पहा असें ते करीत. मुस्लीमलीगवरील टीका ते वाचीत होते. रिकामपण कसें तें त्यांस माहीतच नव्हते. इतक्यांत सरोजिनीबाईस पाहतांच 'आपले म्हणणे खरें होणार, आपली इच्छा सफळ होण्याच्या मार्गास लागली हेच कळविण्यास आलां ना इतक्या तांतडीने?' असें ते एकदम म्हणाले. भराभरा प्रश्नांचा भडिमार त्यांनी सुरू केला. सर्व वृत्त यथावत् जाणून घेतलं. गोपाळरावांच्या फटफटीत चेहऱ्यावर प्रसन्नतेची छटा दिसूं लागली. सरोजिनीबाई म्हणाल्या 'राष्ट्रीय सभेनेही मुस्लिम लीगकडे सहानुभूतीची दृष्टि ठेविली पाहिजे. मी मुसलमानांस तसें वचन दिले आहे. गोपाळराव म्हणाले 'माझ्या हातांत जेवढे आहे तेवढे करण्यास मी कमी करणार नाही.' नंतर बाई जाण्यास निघाल्या. 'पुनः दोनप्रहरी या' असे गोपाळराव बोलले.
 दुपारी सरोजिनीबाई एकट्याच गोखल्यांकडे आल्या. गोखले खाली होते. एकाद्या चंडोलाप्रमाणे ते आनंदी दिसले. त्यांची खिन्नता व उद्विग्नता लयास गेली होती. आशेचा किरण डोळ्यांसमोर पुनः चमकूं लागला. भराभरा जिन्याच्या पायऱ्या चढून ते सरोजिनीस वरती घेऊन चालले. 'तुम्ही फार अशक्त व आजारी आहां; या पायऱ्या तुम्ही कसे चढणार?' असें बाई कळकळीने म्हणाल्या. गोखले म्हणाले, 'You have put new hopes into me; I feel strong enough to face life and work again.'
 या उद्गारांवरून मुसलमानांचे व हिंदूचे ऐक्य हा प्रश्न त्यांस किती जिव्हाळ्याचा वाटत होता है दिसून येते. देशाच्या दुर्दैवाबद्दल ज्याचें हृदय अहोरात्र जळतें, ज्यास क्षणभरही शांति मिळत नाहीं, त्याच्या देशभक्तचिं मोल. आम्ही काय करणार? विवेकानंदांनी एके ठिकाणी म्हटले आहे :- 'स्वदेश- भक्तीसंबंधाची माझी ही व्याख्या ठरलेली आहे. कोणत्याही महाकृत्याचे मुळाशी तीन गोष्टी अवश्यक असतात. पहिली गोष्ट म्हणजे अंतःकरणाची तळमळ; बुद्धीत किंवा तर्कशक्तीत वास्तविक काय अर्थ आहे? बुद्धि किंवा तर्कशक्ति कांही पावलें जाते आणि पुढील मार्ग आक्रमण करतां न आल्यामुळे अडखळून पडते. स्फूर्तींचा झरा नेहमी अंतःकरणांतूनच वहात असतो. बुद्धीला उघडण्याला अशक्य असलेले दरवाजे प्रेमच उघडू शकते. विश्वाच्या बुडाशी असलेली रहस्ये उघडी होण्याचा दरवाजा, प्रेम उघडू.