या मनःस्थितीचं सुंदर चित्र रेखाटले आहे. सरोजिनीची व गोपाळराव गोखल्यांची प्रथम भेट १९०६ मध्ये झाली. त्या वेळेस कलकत्यास सामाजिक परिषद भरली होती. त्यांत सरोजिनीचे उत्कृष्ट भाषण झाले. गोखल्यांनी त्यांस प्रशंसापर पत्र पाठविले. १९०७-११ पर्यंत मुंबई, पुणे, मद्रास, दिल्ली, वगैरे ठिकाणी त्यांच्या गांठी पडत असत. परंतु एकमेकांची जास्त ओळख १९१२ च्या आरंभी झालो. या वेळेस कलकत्त्यास सरोजिनीच्या वडिलांच्या घरीच गोपाळराव उतरले होते. एके दिवशी गोपाळराव खिन्न व उदास अंतःकरणाने बसले होते. इतक्यांत सरोजिनी बाई तेथे आला. आपल्या राष्ट्राचे पुढे काय होणार या विषयीं त्याच्या मनांत विचार घोळत होते. ते सरोजिनीस एकदम मोठ्या उत्सुकतेनें म्हणाले 'हिंदुस्तानाविषयी आपणांस काय वाटते?' 'माझी एकत्र इच्छा आहे' असे बाई बोलल्या. 'हिंदुस्तानचे लवकरच काय होईल?'- असे पुनः उतावळेपणाने त्यांनी विचारले. 'पांच वर्षात हिंदुमुसलमानांचं ऐक्य' होईल असे उद्गार सरोजिनीने काढले ते ऐकून विषण्ण व निराश असे स्मित गोपाळरावांनी केले आणि ते म्हणाले, 'You are a poet, but you hope too much. It will not come in your life-time or in mine. Keep your faith and work if you can.' प्रकृति नादुरुस्त झाल्यामुळे गोपाळराव पुण्यास आले. ते अशक्त झाले होते. जिना चढण्याचीही त्यांस ताकद नव्हती.
१९१२ च्या मार्च महिन्यांत २२ तारखेस जी मॉस्लेमलीगची बैठक झाली तेथे सरोजिनीबाईस आमंत्रण होते. तेथे बाईंनी अत्यंत महत्त्वाचें जोरदार. व वकृत्वपरिपूर्ण असे भाषण केले. ऐक्याची देशास किती जरुरी आहे हें आपल्या रसाळ काव्यमय परंतु स्फूर्तिदायक वाणीने त्यांनी मुसलमानांम पटविलें, लखनौस हिंदूंबरोबर सहकार्य करण्याचा ठराव बहुमताने पास झाला. काम संपतांच सरोजिनीबाई एकदम थेट पुण्यपत्तनी आल्या. गोपाळरावांस आपण समक्ष झालेली हकीगत केव्हां सांगू असं त्यांस झाले होते.
२६ मार्च रोजी नामदार परांजप्यांसह सरोजिनीबाई गोपाळरावांस भेटण्यासाठी भारत सेवक समाजाच्या सदनांत गेल्या. गोखले अशक्त झाले होते.
पान:ना. गोखले चरित्र.pdf/२१३
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३
हिंदुमुसलमानांच्या ऐक्यासंबंधी गोपाळरावांची निराशा.