In our day the British connection has had no stouter and more convinced supporter than the late Sir Syed Ahmed, than whom no Mahomedan has deserved or enjoyed greater influence over his Indian Co-religionists.' राष्ट्रीय सभा दर वर्षी मुस्लिम संघाचा पाठिंबा मागत असे. परंतु छे; हिंदूंशी एकी? मग आम्ही हाडाचे मुसलमान कसचे? या सय्यद अहंमदानंतर आगाखान पुढे आले. त्यांनी मॉस्लेम लीग स्थापन केली. त्यांचे ध्येय थोडक्यांत असें होतें. "The ordered development of the country under the Imperial Crown." सरकार या मुसलमानांस गोंजारत होते. बंगालची फाळणी केल्यानें मुसलमानांचें कांहींच नुकसान होत नव्हतें. उलट त्यांचे हितसंबंधच दिसत होते. अर्थात् मुसलमान राष्ट्रीय चळवळीत सामील होत ना. त्यांस माल मिळू नये, समाजांत त्यांच्याशी मिसळू नये, अशी प्रवृत्ति बंगालमध्ये दिसूं लागली. तेव्हां मुसलमानांनी दंगे केले. सरकारने या बाबतीच अर्थातच पक्षपात दाखविला. पेशावरमध्येही दंगे झाले, निजामहैदराबादेसही आग पेटली. सर्व हिंदू एकदिल झाले असतां मुसलमानांनी हिंदूस व पुढे मुसलमानांसही चिरडणाऱ्या सभेस पाठिंबा द्यावा हें हिंदूस कसे सहन होणार? आमच्या देशांत आलां आणि पुनः आम्हांवर उठलेल्या अरेरावास तुम्ही सहाय्य करतां? या गोष्टीचा कोणास संताय येणार नाही? वेळ आली म्हणजे सरकार उभयतांस चिरडून टाकील. तोपर्यंत अल्पसंख्याकांची बाजू आपण घेत आहों असा बहाणा सरकार करील. परंतु मुसलमान बंधूस व त्यांच्या पुढाऱ्यांस हें पसंत पडत नव्हते. १९०७ मधील गोपाळरावांच्या दौऱ्याने त्यांची मने थोडीफार निवळली होती, परंतु पुन्हां दंगे झाले आणि ऐक्याची अंधुक किरणशलाकाही गोपाळरावांच्या मनांतून लोपली. या प्रश्नासंबंधी ते फार चिंताग्रस्त असत. जर कधी काळी हिंदुमुसलमानांचं ऐक्य होणार नसेल तर या देशाचे कसे व्हावे? समजा वसाहतीचा दर्जा मिळाला तरी या आपसांतील वितुष्टाने कारभार चालावा कसा? या देशभक्ताचें मन या चिंतेमुळे उदास व खिन्न होई. देशाची भवितव्यता त्यास चमत्कारिक दिसे, रानड्यांनी काढलेलें देशाच्या स्थितीचें भावि मनोरम चित्र चित्तास रमवितें- परंतु बुद्धीस हें शक्य दिसत नाहीं. सरोजिनीबाईनी आपल्या आठवणीत गोखल्यांच्या
पान:ना. गोखले चरित्र.pdf/२१२
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२
हिंदुमुसलमानांच्या तंट्यासंबंधीं गोखल्यांस जाळणारी चिंता.