आले. १९०८ मध्यें हिंदुस्तानांतील मुजफरपुर वगैरे ठिकाणचे अत्याचार पाहून मिंटो म्हणतात. 'I am determined that no anarchical crimes will for an instant deter me from endeavouring to meet as best I can the political aspirations of honest reformers.' मिंटोच्या या उद्गारांनी गोखल्यांच्या जिवांत जीव आला. आणि आपणांस नक्की हक्क मिळणार असं त्यांस वाटू लागले.
१९०९ च्या आरंभी त्यांस अमेरिकेत व्याख्याने देण्यासाठी मोठ्या मानाचें निमंत्रण आले होते. परंतु १९०८ च्या उत्तरार्धात ज्या सुधारणा जाहीर करण्यांत आल्या, त्यांचे नियम, कायदे वगैरे सर्व या वर्षी करावयाचें असल्यामुळे गोखल्यांस या विनंतीचा साभार स्वीकार करितां येईना. आपल्या देशांतील काम सोडून अन्यत्र बडेजावासाठी गोपाळराव जातील ही कल्पनाही होत नाही. १९०९ च्या फेब्रुवारी महिन्यांत, सुधारलेलें बिल पार्लमेंटपुढे मांडण्यांत आलें. अल्प वादविवाद होऊन १९०९ च्या मे महिन्यांत कायदा जाहीर करण्यांत आला. १९०६ च्या मे महिन्यांत मिंटो म्हणाले होते- 'The possibility of the development of administrative machinery in accordance with new conditions.' याचा विचार करण्यांत येईल. १९०७ मध्ये खर्डा तयार झाला; १९०८ मध्ये तो सुधारून नीट करण्यांत आला. १९०९ च्या मे महिन्यांत कायदा म्हणून पास झाला व तीन वर्षे या कायद्याचा बोलबाला होत होता. परंतु या कायद्याने जे दिलें तें हिंदुस्तानांतील नियम घटना वगैरेंनी बरेंचसें हिरावण्यांत आले. यामुळे त्यांत तथ्य असें विशेष राहिलें नाहीं. सुधारणा संकुचित करण्यांत आल्या. जणू हिंदुस्तानास हा घांस पचणार नाहीं असें सरकारास वाटलें! नेमस्त पुढाऱ्यांस, गोखल्यांस या गोष्टीचा फार संताप आला. परंतु संतापाव्यतिरिक्त दुसरें काय करणार? कदाचित हे नियम घालण्यास देशांतील वाढते अत्याचार कारण झाले असावे. बंगालमध्ये खून, दरवडे, बाँब यांचा सर्वत्र धूमधडाका चालला होता. महाराष्ट्रांत नाशिकसारख्या ठिकाणी कट उघडकीस आले. रोज नित्य अत्याचारांची बातमी असावयाची. सरकारच्या कच्छपी असणारे देशी अधिकारी, गोरे लोक, यांचे बळी कोठें कोठें पडू लागले. या परि
पान:ना. गोखले चरित्र.pdf/२०६
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६
मातीमोल मोर्ले-मिंटो सुधारणा !