स्थितींत गोपाळरावांनी मुंबई व पुणे येथे व्याख्याने दिली. अशा क्रांतिकारक वातावरणांत शांततेचा दीप दाखविणे किती कठिण असतें? भ्याड, सरकारशी हितगुज करणारे, देशद्रोही, अशा पदव्या बहाल होत असतात. गोखल्यांस या गोष्टींची पर्वा नव्हती. लोकांच्या बेफाम मनास न रुचणारा परंतु परिणामी पथ्यकर असा उपदेश करण्यास ते कचरले नाहीत. या अत्याचारांनी सरकारचा एक रोमही वांकडा होणार नाहीं. आपले उमदे, वीर्याचे, धैर्याचे शेकडों बांड, तरुण, मात्र प्राणांस मुकतील; फांसावर लटकविले जातील; काळ्यापाण्यावर पोचविण्यांत येतील. ज्या स्वार्थत्यागापासून यत्किंचितही फायदा नाही तो करण्यांत स्वार्थनिरपेक्षता दिसली, प्राणांची बेपर्वाई दिसली तरी मातृभूमीचा फायदा नाहीं. आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेत आहों असें त्यांनी सांगितले. आशावादी बनून प्रयत्न करा. सर्व लोकांत संघटना करा. आणि हे संघट्टन, ही एकी झाली, एका कार्यासाठी हजारों, लाखों लोक पुढे येऊ लागले की करबंदीसारखी जी पूर्ण सनदशीर चळवळ आहे ती हाती घ्या. परंतु आज एक अधिकारी मारा आणि त्याबदला स्वतःचे तीन चार इसम फांशीं, पांचसहा जन्मठेप काळ्यापाण्यावर, असे करून घेण्यांत काय फायदा आहे? या प्राणाहुतींनी निजलेले जागे होतील. या प्राणार्पणाने आळशी पुढे येतील. देशसेवेसाठी स्वार्थावर कसा बहिष्कार घालावा लागतो ते त्यांस समजेल. हा फायदा लहानसान नाहीं. आणि सर्वच वेळां फायदा काय हें पाहून चालत नाही. ज्या सरकारच्या राज्यांत जगण्यासारखं कांहीं नाहीं तेथे मेलेच पाहिजे. अशी वृत्ति या तरुण वीरांनी दुसऱ्यांत उत्पन्न केली खरी. परंतु त्यांचे हृदयद्रावक परिणाम ज्यांनी पाहिले व ऐकले ते कचरले. यापासून देशाची वास्तविक कांहीं प्रगति होईल कां? अफाट सामर्थ्याच्या सरकारविरुद्ध असहाय, एकाकी व निःशस्त्र, लोक कसे टिकणार? हा मार्ग भावनेस पटला, हृदयास रुचला तरी बुद्धीस पटत नाही. अन्य मार्गानी चला. खुनानें कां कोठें स्वराज्य मिळते? त्यासाठी मोठी बंडे करावी लागतात. बंड करण्यास शस्त्र कोठें आहेत? परकी सरकारासही आधी बोलावितां येत नाहीं. सारांश काय, लढाईचा मार्ग आपणांस बहुतेक बंद आहे. त्या मार्गाने आपल्या प्रचंड देशास जातां येणार नाहीं. लढाई पुनः सर्वत्र सुरू झाली तर सर-
पान:ना. गोखले चरित्र.pdf/२०७
Appearance