Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गोखल्यांची विलायतेतील कामगिरी.

होत्या. या दोनही ठिकाणी एतद्देशीय निवडण्यांत येऊ लागले याचे बरेचसे श्रेय गोखल्यांस आहे. कारण मिंटो साहेब हे गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी कौंसिलांत एतद्देशीय नेमण्यास फारसे अनुकूल नव्हते. मोर्ले, मिंटो साहेबांस लिहितात, जर आपण तेथील कार्यकारी मंडळांत एतद्देशीय प्रतिनिधि घेण्यास तयार नसाल तर मी स्टेटसेक्रेटरीच्या कौन्सिलांत नेमणारच. गोपाळरावांस स्वतःस इंग्लंडमधील ही आपली शेवटली खेप असे वाटत होते. पुनः आतां इंग्लंडमध्ये येण्याची मला जरुरी पडणार नाही असे ते बोलून दाखवीत होते. आतां आपले शेष आयुष्य आपल्या देशांतच लोकांच्या उन्नत्यर्थ अहर्निश यांत दवडावयाचे असा त्यांनी मनाशी पक्का निश्चय केला. ज्या वेळेस ते मोर्ले साहेबांस भेटण्यासाठी म्हणून डिसेंबरच्या प्रारंभी गेले तेव्हां हा आपला मनोदय त्यांनी मोर्ले साहेबांस कळविला. मोर्ले साहेबांनी त्यांच्यापुढे सर्व सुधारणांचा पाढा वाचला नाही. परंतु त्या कोणत्या स्वरूपाच्या असतील याचा तर्क बांधणे कठिण नव्हते. मोर्ले लिहितात :-
 "He thinks he will never come to England again; no more work to be done for India here, must work in his own country. This is the moment of crisis; if nothing comes of our attempt then the Extremists will have their way; confusion, danger and ruin will follow. On the whole his tone both attracted and impressed me." मोर्ले साहेबांनी मिंटोस एतद्देशीयांस विशेष जागा, बड्या पगाराच्या जागा देण्यास सुरुवात करा असे सुचविले. राज्यकारभारांत हक्क असण्यापेक्षां पगारी जागांकडेच लोकांचें लक्ष जास्त असते. तेव्हां या प्रयोगाने लोकांस आशाळभूत बनवा म्हणजे झाले. परंतु मोर्ले साहेबांचा हा सल्ला इकडे थोडाच रुचणार आहे! गोखल्यांच्या या वेळच्या इंग्लंडमधील कामगिरीचा सर्वांनी प्रशंसापर उल्लेख केला आहे. लॉर्ड रे साहेब, हार्डिज साहेब यांनी गोखल्यांची कामगिरी किती महत्त्वाची होती हें स्पष्ट सांगितले आहे. लॉर्ड हार्डिज म्हणतात "I have always understood that he took a quiet but active part in the conversations that led up to the reform of this and the other Indian Councils." विलायतेतील कामगिरी संपल्यानंतर गोखले मायभूमीस परत