Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६१
लाला लजपतराय अध्यक्षपद नाकारतात.

सुटकेसाठी त्यांनी प्रयत्नही केले होते. लालाजींस गोखले जर सरकारच्या मोहबतीखातर भिते तर त्यांच्या सोडवणुकीसाठीं त्यांनी टाइम्समध्ये पत्र कां प्रसिद्ध केलें असतें? परंतु एका चरित्रकाराने म्हटल्याप्रमाणे 'People always are misunderstood. They are blameless, but their conduct is misrepresented. They are conscious of having felt precisely the reverse of what is attributed to them; and they wonder that they are not known better'. याप्रमाणें गोखल्यांच्या सध्देतूचाही विपर्यास करण्यांत आला.
 परंतु शेवटी लालाजींनी स्वतःच मनाच्या थोरपणानें 'मी अध्यक्ष होत नाहीं,' असे जाहीर केलें. या करण्यामुळे तर राष्ट्रीय पक्ष फारच चिरडीस गेला. कलकत्त्याचे पास झालेले स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार, स्वराज्य, वगैरे ठराव येथें नापास होणार, ते ठराव पत्रिकेत घातलेलेही नाहींत, अशी त्यानें खोटीच अवाई उठविली. खरे पाहिले तर कलकत्त्यास 'स्वराज्य' असा ठराव पास झालाच नव्हता. तो शब्द फक्त दादाभाईंच्या स्फूर्तिप्रद भाषणांत बाहेर आला. बहिष्कार हा सर्वराष्ट्रीय करून सर्व सरकारी संस्थांवर घालावयाचा असें जरी राष्ट्रीय पक्षास वाटत होतें तरी वस्तुतः तें तसें नव्हतें. कारण कलकत्त्यास गोखल्यांनी उठून हे म्हणजे मोडून काढलें होतें. जे ठराव कलकत्त्यास ज्या स्वरूपांत पास झाले तेच ठराव येथेही ठराव- पत्रिकेत घातले होते. कलकत्त्याच्या राष्ट्रीय सभेचा रिपोर्ट अद्याप प्रसिद्ध झाला नसल्यामुळे गोखल्यांस 'इंडिया' पत्रांतून त्या वेळचे ठराव आपल्या ठरावपत्रिकेत घालावे लागले. असे करतांना स्वदेशीच्या ठरावांत, दादाभाईंनी स्वतः टिळकांच्या सांगीवरून घातलेले 'धस सोसूनही स्वदेशी वापरणें' हे शब्द गाळले गेले. परंतु इंडिया पत्रांतील प्रसिद्ध झालेल्या ठरावांतसुद्धां हे शब्द नव्हते. शिवाय ही ठराव- पत्रिका म्हणजे कांहीं वज्रलेप नव्हे कीं, त्यांतील ठराव व त्यांची भाषा यांच्यावर रणें माजवावीं. आजपर्यंत असें अनेकदां झालें असेल कीं, पत्रिकेंत घातलेले ठराव विषयनियामक कमिटीत साफ बदलले; केव्हां नवीन शब्द घातले; केव्हां कांहीं ठराव गाळले. तेव्हां विषयनियामक कमिटीच्या आधीच गोखल्यांवर आग पाखडणें न्याय्य नव्हते. या ठरावपत्रिकाही वेळेवर छापून