मिळाल्या नाहीत त्यास गोखले काय करणार? जेव्हा छापून झाल्या तेव्हां ताबडतोब त्यांनी एक प्रत टिळकांस दिली, एक लालाजींस दिली. यानंतर टिळक पक्षाचें असें म्हणणें पडलें कीं जर कलकत्याचे ठराव त्याच स्वरूपांत येथें पास होणार असतील तर अध्यक्षांच्या सूचनेस आम्ही विरोध करणार नाहीं; नाहीं तर आम्हांस अध्यक्ष पसंत नाहीत. परंतु सोळाशे सभासदांची हमी गोखले कशी बरे घेणार? असे विचारणें म्हणजे राष्ट्रीय सभा मोडण्यासारखेच होतें आणि अखेर तसेच झालें. गोखल्यांनी पुष्कळ सभासदांस बोलावून सांगितलें की ठराव मागे घेण्यांत आलेले नाहींत, विषय नियामक कमिटी काय ठरवील तें खरें, शेवटीं २७ वी तारीख उजाडली. अडीच वाजतां सभेच्या कामास सुरुवात झाली. स्वागताध्यक्षाचें भाषण झाल्यावर, अंबालाल सक्करलाल यांनी अध्यक्षांची सूचना पुढे मांडली. डॉ. घोष यांचें नांव उच्चारतांच 'नको नको,' असे उद्गार उठूं लागले. परंतु त्यांनी या हलकल्लोळांतून आपले भाषण कसेबसे संपविलें. नंतर सुरेंद्रनाथ दुजोरा देण्यासाठी उठले, त्यांचे पहिलेच वाक्य उच्चारलें जातें न जातें तोच, त्यांस खाली बसावयास लावण्यासाठीं कांहीं लोकांनी एकच गोंगाट सुरू केला. स्वागताध्यक्षानें पुनः पुनः शांत राहण्यासाठी लोकांस विनंति केली; परंतु कांहीं उपयोग झाला नाहीं. सुरेंद्रनाथांनी विचारिलें,'Have things come to such a pass?' त्यावर 'होय, होय,' अशी उत्तरे मिळाली. शेवटी अध्यक्षांनी 'जर तुम्ही शांत राहणार नाहीं, तर मी सभा बरखास्त करीन असें सांगितलें. सुरेंद्रनाथ बोलूं लागले. परंतु त्यांचा खडा स्वरही लोकांच्या गर्जनेत विलीन झाला. अध्यक्षांनी सभा बरखास्त केली.
रात्री टिळक हे गोखले वगैरे मंडळींस भेटण्यासाठी जाणार होते परंतु गोखल्यांनीच त्यांनां झिडकारिलें असें खोटेंच प्रसृत करण्यांत आलें. गोखल्यांच्या जवळ टिळक यासंबंधीं बोलले नाहीत; त्यांनी तशी इच्छा दर्शविली नाहीं; किंवा चिठी वगैरेही कांहीं पाठविली नाहीं.
दुसऱ्या दिवशीं एक वाजतां पुनः सभेस आरंभ झाला. टिळकांनीं, स्वागताध्यक्ष माळवी यांच्याजवळ एक चिठी दिली. परंतु ही चिठी सर्व काँग्रेस बंद ठेवा अशा अर्थाची आहे असें समजून माळवी यांनी
पान:ना. गोखले चरित्र.pdf/१९४
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६२
सुरतची काँग्रेस.