Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६०
गोखल्यांची उदात्त विचारसरणी.

कृतज्ञता व्यक्त करणें हें आपले कर्तव्य होय.' लालाजींस मानमरातबाचा मातब्बरी नव्हती. परंतु निरपेक्ष सेवा करणारा जो असतो त्याच्यासाठीं वैभव चालून येतें. राष्ट्रीय पक्षाची ही मागणी नेमस्त मान्य करीनात. गोखल्यांनीं समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. शेवटीं 'लालाजी अध्यक्ष होण्यास तयार असतील तर तुम्ही खुशाल त्यांस अध्यक्ष करा' असें त्यांनी सांगितलें. राष्ट्रीय पक्ष पेंचांत सांपडला. जर मवाळ पक्षाचें आपणांस पाठबळ नसेल तर लालाजी अध्यक्ष होण्यास कसे तयार होतील? लालाजींस असें अपमानास्पद स्थान स्वीकारा असें सांगण्यास राष्ट्रीय पक्ष धजला नाहीं.
 सर्व प्रयत्न हरले तेव्हां राशबिहारी अध्यक्ष आहांस पसंत नाहींत असें राष्ट्रीय पक्ष म्हणूं लागला. याला एक कारणही त्यास सांपडलें. नियोजित अध्यक्ष राशबिहारी घोष यांनी नवीन राष्ट्रीय पक्षासंबंधी अनुदार उद्गार कौन्सिलमध्ये उच्चारले होते. राष्ट्रीय पक्ष झाला तरी तो देशासाठींच तळमळत होता. चुकत असला तरी स्वार्थासाठी झुरत नव्हता; तर मातृभूच्या उद्धारासाठीच आपसांत कितीही भांडणे झाली तरी आपणां दोघांसही चिरडण्यास जो शत्रूप्रमाणें टपला आहे, त्याच्या जवळ एकमेकांची नालस्ती करणें म्हणजे फार निंद्य गोष्ट होय असे आम्हांस वाटतें. या बाबतींत ना. गोखले हे जास्त थोर मनाचे होते, ते नेव्हिन्सन साहेबांजवळ टिळकपक्षाविषयी बोलतांना म्हणाले, 'But we are not likely to denounce a section of our own people in the face of the bureaucracy. For, after all, they have in view the same great object as ourselves'. राष्ट्रीय पक्षानें लालाजी अध्यक्ष व्हावे म्हणून सुचविलें. पण त्याचें म्हणणें गोखल्यांनीं सयुक्तिक पणे खोडून काढले. सर्व स्वागत कमिटीनें राशबिहारी यांस अध्यक्ष निवडलें असतां आतां लालाजींस अध्यक्ष करण्यानें पुष्कळ लोकांचीं मनें दुखवतील. लालाजींस आज जी सर्व राष्ट्राची सहानुभूति पाहिजे ती नाहींशी होईल. लालाजींस विनापराध हद्दपार केलें, याचा सरकारास जाब विचारतांना सर्वांनी लालाजींस पाठिंबा दिला पाहिजे असें गोखल्यांचें म्हणणें होतें. लालाजींस अध्यक्ष करण्यास गोखले भीत होते, असा त्यांच्यावर पुष्कळांनी आरोप केला आहे. परंतु गोखले इतके भ्याड खास नव्हते. ते लालाजींचे स्नेही होते. व त्यांच्या