संपादक आपली बाजूही न्यायसभेत पुढे मांडण्यास कबूल नव्हता. "He did not think that in carrying on the God-appointed mission of स्वराज्य he was in any way responsible to the alien rulers." "ईश्वरानें नेमून दिलेलें स्वराज्यमंत्रप्रसाराचे पवित्र कार्य मी करीत आहें. परकीय सत्ताधाऱ्यांची माझ्यावर काडीइतकीही सत्ता नाहीं." बाबू अरविंद घोष यांसही कैद करण्यांत आलें. अशा प्रकारें भराभर नानाप्रकारच्या उद्वेगकारक परंतु स्फूर्तिदायक गोष्टी दररोज कानीं येऊ लागल्या. शिक्षा देण्यांत सुद्धां सारासार विचारास थाराच नसे. ज्या- प्रमाणे इंग्लंडांत कांकडी चोरण्याबद्दल फांसावर लटकण्याची पाळी येई तशाच मासल्याची तऱ्हा येथे झाली. एके ठिकाणीं चार मुलांनीं वाण्याची चवदा आणे किंमतीची विलायती साखर नासली म्हणून तीन आणि चार महिन्यांच्या शिक्षा त्यांस दिल्या. परंतु ज्यांस अशा शिक्षा होतात ते लोकांस ललामभूत होतात. लोक त्यांस मिरवितात आणि सरकारचीच मानखंडना होते. परंतु निर्लज्ज सरकारास त्याचे काय होय? सरकारनें सभाबंदीचा कायदा १ नोव्हेंबर १९०७ रोजी पास केला. गोखले यांनी या कायद्यास कसून विरोध केला; राशबिहारीनींही विरोध केला, परंतु सरकार थोडीच भीक घालणार? कितीही विरोध करा, सरकारला हवें तें करण्यास सामर्थ्य आहे.
लाला लजपतराय व अजितसिंग यांस सहा महिन्यांनी नोव्हेंबरच्या ११ तारखेस मुक्त करण्यांत आलें. लाला लजपतराय व गोखले हे मित्र होते. इंग्लंडांत १९०५ मध्ये जेव्हां गोखले मुंबई प्रांतातर्फे वळवळ करण्यास गेले होते त्या वेळीं पंजाबतर्फे लजपतराय गेले होते. त्या वेळेस एकमेकांची एकमेकांस मदत झाली होती. लालाजींस नाहक होणारा जाच नाहींसा व्हावा म्हणून गोखल्यांनी 'टाइम्स' मध्ये एक पत्र प्रसिद्ध केलें होतें. परंतु त्याचा तादृश उपयोग झाला नाहीं.
लालाजींची सुटका झाल्यावर राष्ट्रीय सभेस निराळाच रंग चढूं लागला, सुरतचे राष्ट्रीय पक्षाचे लोक म्हणूं लागले 'आम्हांस लालाजी अध्यक्ष पाहिजेत. देशसेवेसाठीं त्यांस अंदमान पहावें लागलें तेव्हां आपण त्यांस राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षत्वाचा मान देऊन त्यांचा गौरव करणें व
पान:ना. गोखले चरित्र.pdf/१९१
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५९
अनन्वित दडपशाही - सभाबंदीचा कायदा.