Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५४
कोमिल्लाचे दंगे.

and have for centuries held different countries in your grasp. For seven hundred years in India you have had imperial sway. You know what it is to rule. Be not unjust to that nation which is ruling over you. You can appreciate these matters; but they cannot who have never held a country in their hands nor won a victory'. फाळणी ही मुसलमानांच्या पथ्यावरच पडली. त्यांचें नुकसान कांहींच नव्हतें. फाळणी- नंतर स्वदेशी आली. मुसलमान स्वदेशी स्वीकारीनात. त्यांच्यावर सार्वजनिक बहिष्कार टाकून त्यांस जिन्नस मिळू नये असे करण्यांत आलें शेवटी डाक्याचा नबाब सलीमउल्ला याच्या चिथावणीनं कोमिल्ला येथें दंगे झाले. त्यांत मुसलमानांनीं अनन्वित प्रकार केले. सरकारचीही त्यांस फूस होती. जखम पसरत चालली, अंतःकरण सळसळू लागलें, आणि आधींच बिथरलेला बंगाल बेताल झाला, बेभान झाला, भावनांनीं भारून गेला.
 लोकांचा इंग्रज सरकारवरचा विश्वास समूळ नाहींसा झाला होता. तेजस्वी लेखक आपल्या रसरशीत व स्फूर्तिदायक लेखांनी तरुणांची मनें वाटेल त्या स्वार्थत्यागास तयार करण्याचे काम करीत होते. स्वदेशीचें व्रत, व शक्तिदेवीची उपासना यांचा उपदेश जोराने होऊ लागला. खरोखर हें स्वदेशीचें व्रत महाराष्ट्रांत फार पूर्वीपासून सुरू झाले होते. लॉर्ड रिपनच्या कारकिर्दीत आपल्याकडील सुप्रसिद्ध देशसेवक विश्वनाथ नारायण मंडलीक हे एकदां कलकत्यास गेले होते. त्या वेळेस ज्या बंगाली गृहस्थाकडे ते उतरले होते, ते गृहस्थ त्यांची जाडीभरडीं धोतरे पाहून चकित झाले. त्यांच्या प्रश्नास मंडलिकांनी खालील उत्तर दिले:— 'I must wear these thick clothes, as my country's mills cannot yet produce any finer fabric." 'जोपर्यंत देशांत तलम कापड होणार नाहीं तोंपर्यंत मला असेंच जाडेभरडे कापड वापरावें लागणार आणि मी वापरीन.' परंतु बंगालमध्ये हें स्वदेशी व्रत बहिष्कारापासून सुरू झालें, आणि लोकांची भावनामय मनें या नवीन उपदेशानें भारून गेलीं. संध्या, नवशक्ति, युगांतर यांसारखीं वृत्तपत्र खरोखरच अपूर्व होती. नवशक्तीमध्ये अरविंद घोष पुष्कळ वेळां