उकळ्या फुटल्या. तें लिहितें, 'Lala Lajpatroy simply becomes honest'. थोरो या प्रख्यात व थोर अमेरिकनानें एके ठिकाणी म्हटलें आहे की 'ज्या राज्यांत कोणीही अन्यायाने पकडला जातो, अशा राज्यांत सच्चा व सचोटीचा जो माणूस असतो त्यास राहण्यास कारागृह हेंच योग्य स्थान होय. (Under a Government which imprisons any unjustly the true place for a just man is also a prison) प्रत्येक चळवळींत ज्यानें पुढाकार घ्यावा, मग ती चळवळ, धार्मिक, शैक्षणिक राजकीय, सामाजिक, कसलीही असो, जो म्हणजे लाखांतही न मिळणारे माणिक, ज्याच्यावर आरोप करण्यास डोळ्यांत तेल घालून बसलें तरी तिळभर सुध्दा जागा सांपडावयाची नाहीं असा मनुष्य सरकारच्या डोळ्यांत साहजिकच खुपावयाचा! मॉडर्न रिव्यू म्हणतो, 'Every child must pray for his well-being and that of the cause and the country, and the sacred word 'a prisoner for country's sake' must shine about his name like a radiant aurora.' सरकारचा अशा लोकांवर दांत, परंतु स्वतःचीं कार्टी मात्र शेफारून ठेवलेली! नेव्हिन्सन म्हणतो 'But in none of the Indian papers have I seen more deliberate attempts to stir up race-hatred and incite to violence than in Anglo-Indian papers which suffer nothing. If the Indian Press is violent Anglo-Indian Press is almost invariably insolent and provocative.' ब्रिटिश सिंह एका पंजाखाली पंजाबला चिरडून टाकीत असतां, तिकडे दुसऱ्या पंजाने बंगालला चिरडीत होता. फाळणीपासूनच बंगालचें नशीब फिरलेलें! सरकार नेहमी मुसलमानांचाच पक्षपात करावयाचें. मुसलमानांसच जास्त जागा द्यावयाच्या. १५ मे १९०६ रोजी सरकारने एक सर्क्युलर काढलें कीं, मुसलमानांची ठरीव संख्या भरून निघेपर्यत हिंदूंस नौकरी द्यावयाची नाहीं. मुसलमानांचे पुढारी सरकारच्या कच्छपी लागून आत्महित करण्यास मुसलमानांस सांगत. सय्यद अहंमदांचे अभिमानाचे व ताठ्याचे उद्गार वाचा कीं मुसलमानी कावा कसा आहे तो लक्षांत येईल. ते म्हणतात:- 'My brother Musalmans, I again remind you that you have ruled nations,
पान:ना. गोखले चरित्र.pdf/१८५
Appearance