लोकांचा इतिहास फार स्फूर्तिदायक आहे. आपली घरेंदारें, आपला देश सोडून लांबलांबच्या देशांत सेंट झेव्हिअरसारखे लोक केवळ एकाच ध्येयाने प्रेरित होऊन- परक्या लोकांत, प्रतिकूल परिस्थितीस न जुमानतां जात; ज्यांची भाषा भिन्न, रीतिरिवाज भिन्न, त्यांस त्यांची भाषा शिकून उपदेश करणें, त्यांच्या भाषांची व्याकरणें लिहिणं, त्यांस सुशिक्षित करण्यासाठी शाळा उघडणें या गोष्टींची कोण मनुष्य प्रशंसा करणार नाहीं? मनुष्यमात्राचें कल्याण- आपआपल्या बुद्धीप्रमाणें व समजुतीनुसार करण्याची ही केवढी महनीय इच्छा? या सदिच्छेचें कौतुक कोण करणार नाहीं? मिशनरी लोक परक्याच्या प्रांतांत जाऊन जर इतकी खटपट करतात तर आपल्याच देशांत, ज्यांचीं मनें आपण जाणतों, ज्यांचे आचारविचार व स्वभाव आपणांस पूर्ण माहीत आहेत, जे आपल्याच धर्माचे व हाडामांसाचे, ज्यांचे व आपले हितसंबंध एकत्र निगडित झाले आहेत त्यांच्यामध्ये कार्य करण्याची स्फूर्ति आपणांस कां होऊं नये?
या जेसुइट लोकांपेक्षां कदाचित् रामदासी पंथ गोपाळरावांच्या मनचक्षूंसमोर जास्त प्रामुख्यानें असावा. रामदासांचें सतराव्या शतकांतील कार्य पाहिलें कीं, मन चकित होतें. दळणवळणाचीं नीट साधनें नसतांना, व मुसलमानांचें वर्चस्व सर्वत्र स्थापित झालेलें असतांना त्यांनीं अकराशें मठ स्थापले. असा एकही देशाचा भाग सोडला नाहीं कीं जेथें मठ नाहीं. जें जें भरभराटीचें मुसलमानी शहर असेल तेथें तेथें समर्थांचे दोन मठ असावयाचेच. या मठांचे एकीकरण केलें, प्रत्येकास शिस्त लाविली, मठांतून ग्रंथालये उघडलीं, आणि एक प्रकारें सर्व प्रकारचें नवचैतन्य राष्ट्रांत खेळविलें, नसांनसांतून जीवनरस ओतला. जें समर्थ एकटे भिक्षेच्या बळावर कोणापाशीं विशेष याचना न करितां करूं शकले तें सध्याच्या सुशिक्षणाच्या वाढत्या काळांत, दळणवळणाची साधनें अनुकूल असतां कां करतां येऊं नये? करतां येईल, परंतु प्रयत्न झाले पाहिजेत. 'जो तो बुद्धीच सांगतो' हा मामला मोडून जे आपला नेता सांगेल तदनुसार वागणें हेंच अनुयायांचे काम असावें आणि अशा रीतीनें संघटित काम सूत्र-पद्धतीनें जर केलें तर होईल असे गोपाळरावांस वाटले असावे. एकएकट्यांनी प्रयत्न करणें आणि एकमेकांच्या प्रयत्नांची एक
पान:ना. गोखले चरित्र.pdf/१७८
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४६
जेसुइट व रामदासी पंथांचें स्फूर्तिजनक कार्य.