६ मी कोणाबरोबर खासगी, व्यक्तिगत भांडणे भांडणार नाहीं.
७ सोसायटीचें ध्येय सदोदित मी डोळ्यांसमोर ठेवीन. शक्य तितक्या कळकळीनें व उत्कटतेनें मी सोसायटीच्या अभिवृध्यर्थ प्रयत्न करीन. सोसायटीच्या ध्येयाला प्रतिकूल असें मी कांहीं करणार नाहीं.
१८९७ पासून गोपाळरावांच्या मनांत असा एकादा राजकीय पंथ निर्माण करावा असें घोळत होतें. त्या वेळचा त्यांचा विचार रामदासी पंथाप्रमाणे होता. बारा वर्षांची, बुद्धिमान् व पाणीदार मुले आपल्याजवळ ठेवावयाची; त्यांच्या पालकांपासून आम्ही मुलांस परत नेणार नाहीं असा करार करून घ्यावयाचा; नंतर या मुलांस सर्व प्रकारचें राजकीय शिक्षण द्यावयाचे; इंग्रजी शिकवावयाचें आणि आठ दहा वर्षे दृढ अध्ययन झाल्यावर निरनिराळ्या ठिकाणी कामे करण्यासाठी हे राजकीय संदेश- वाहक पाठवून देऊन एकीकरण करावयाचें; असा त्यांचा प्रथम मानस होता; या मुलांचा सर्व खर्च कसा चालावयाचा? याकरितां गोपाळरावांनी एक युक्ति योजिली होती. त्यांनी आपले संबंधी दत्तोपंत वेलणकर यांस पुण्यास बोलाविलें. दत्तोपंत हे गोखल्यांच्या बंधूंचे जांवई. त्यांनी दत्तोपंत यांस भांडवल देऊन कांहीं मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदा करा असे सांगितलें, आणि या धंद्याच्या फायद्यांतून या मुलांचा खर्च चालवावयाचे ठरविलें. गोपाळरावांची महत्त्वाकांक्षा जबर आणि ते आपल्या मनांत कल्पनाही मोठ्या मांडीत, परंतु हें शक्य कितपत आहे हें त्यांस मागाहून कळे. रानडे याचें मेमोरिअल करतांना प्रयोगशाळेसंबंधीं त्यांचे असेच मोठे विचार होते. परंतु त्यांतून काय निष्पन्न झालें? असो. पुढें गोपाळराव कौन्सिलमध्ये गेले. मोठ्या लोकांशीं वावरूं लागले. हळूहळू त्यांचे तेज फांकूं लागलें, त्यांचे विचार आतां बदलले. लहान मुलें घेण्याऐवजीं बी. ए. वगैरे झालेली, शिकलेली, तरुणबांड मंडळीच आपल्या पंथांत घ्यावी; त्यांस राजकीय शिक्षण दोन तीन वर्षे द्यावें; त्यांच्या निर्वाहाची तरतूद करून त्यांस देशसेवा हेंच एक कर्तव्य, ध्येय दाखवून द्यावें असें ठरलें आणि वरीलप्रमाणें नियम वगैरे झाले.
हा भारत सेवक समाज निर्माण करितांना गोखल्यांच्या डोळ्यांपुढे युरोपांतील जेसुइट लोकांचे प्रयत्न बहुधा असावे. खरोखर या जेसुइट
१० – गो. च.
पान:ना. गोखले चरित्र.pdf/१७७
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४५
भारत-सेवक समाजाच्या योजनेचा पूर्वेतिहास.