देणें म्हणजे मोर्ले यांस स्वप्न वाटत होतें. या वेळेस मंत्रिमंडळाने किंवा पार्लमेंटने जास्त सुधारणांचे हक्कही दिले असते. परंतु देणारें देते आणि कोठावळ्याचें पोट दुखतें! मोर्ले साहेबांस हिंदुस्तान योग्य दिसत नव्हता. त्यांस हिंदुस्तानास अल्प स्वल्प अधिकार देणेंच हिताचें वाटत होतें. मोर्ले साहेबांचा कंजूषपणा पाहिला म्हणजे छानदार लिहिणारा गडी मनानें किती कृपण व संकुचित असतो हे आढळून या बहुरूपी जगाची गंमत वाटते. आपल्या सुंदर व तत्त्वपूर्ण विचारांनीं जगास झुलविणाऱ्या कलमकुशाग्रणींचें हें कार्पण्य व व्यवहारांतील अनाठायीं कठोरता पाहून मन उद्विग्न होतं व या तकलुपी, वरपांगी लिहिणारांची कीव येते.
मोर्ले साहेबांस हिंदुस्तानास थोडे हक्क देण्यास ही वेळ योग्य आहे असें स्पष्ट दिसत होतें. ते जरा ऐटीनें गोखल्यांस म्हणतात 'ज्याच्यावर मंत्रिमंडळाचा आणि कॉमन्स सभेचा विश्वास आहे असा सेक्रेटरी सुदैवानें तुम्हांस लाभला आहे. तुमचा व्हाइसरॉय हाही सुधारणा द्याव्या याच मताचा आहे. देशांतील इतर सरकारी अधिकारी व्हाइसरॉयच्या विरुद्ध जाणार नाहीत. परंतु या सुधारणा देण्याच्या बाबतीत येऊन जाऊन अडचण येईल, मोडता येईल तो तुमच्या देशांतील वेड्या व जहाल लोकांचा. मोर्लेसाहेब म्हणतात—
Only one thing can spoil it. Perversity and unreason in your friends. If they keep up the ferment in E. Bengal that will only make it hard, or even impossible for Government to move a step. I ask you for no sort of engagement; you must of course be the judge of your own duty, and I am aware that you have your own difficulties. So be it. We are quite in earnest in our resolution to make an effective move. If your speakers or your newspapers set to work to belittle what we do, to clamour for the impossible, then all will go wrong.'
मोर्ले यांची मुत्सद्देगिरी वरील उताऱ्यांत आहे. 'तुमच्या देशांतील अत्याचार बंद करा, नाहीतर कांहीं देत नाहीं.' अशी ही धमकी होती.
पान:ना. गोखले चरित्र.pdf/१५६
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२४
मोर्ल्यांंचें कार्पण्य.