Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२३
गोखल्यांची विलायतेंतील लोकांवर छाप.

फाळणी रद्द करणार असें वाटत होते व अशी दाट वदंताही होती. परंतु कोठें माशी शिंकली कोण जाणे! ज्या गोष्टीमुळे अनर्थपरंपरा ओढवली ती गोष्ट दूर करणें या तत्त्वज्ञ मुत्सद्द्याच्या कां जिवावर आलें कोणास कळे? येवढें खरें कीं, हा व्रण आणखी पांचसहा वर्षे बुजावयाचा नव्हता.
 परंतु गोखल्यांचा इंग्लंडमध्ये जाण्यांत हा मुख्य हेतु नव्हता. उदारपक्षाच्या मंत्रिमंडळाकडून आणा अर्धा आणा राजकीय हक्क मिळाले तर पहावे यासाठीं ते गेले होते. या बाजूनें शक्य ती खटपट त्यांना करावयाची होती. त्यांनी पुष्कळ प्रमुख लोकांच्या भेटी घेतल्या. हिंदुस्तानांतील स्थिति कशी आहे, राज्यकारभार कशा धोरणाने चालतो, हे राज्यकारभाराचे यंत्र कसे अहितकारक आहे हे त्यांनी दाखवून दिले. मोर्ले साहेबांची पहिली मुलाखत त्यांनी गेल्या वर्षीच घेतली होती. नोव्हेंबरमध्ये ते मोर्लेसाहेबांस भेटून अर्धा तास त्यांचे संभाषण झाले होते. या भाषणाविषयी 'Immensely interesting,' असे मोर्ले लिहितात. या वर्षी त्यांची पहिली भेट मे च्या ७-८ तारखेस झाली. मोर्ले साहेबांस हिंदुस्तानविषयक प्रश्न सोडविण्यास गोखल्यांची पुष्कळ मदत झाली यांत शंका नाहीं. गोखले व मोर्ले यांच्या एकंदर पांच मुलाखती झाल्या. शेवटची मुलाखत १ आगष्ट रोजी झाली. मोर्ले साहेब मिंटो यांस लिहितात 'आपण गोखल्यांशी मिळते घेऊन त्यांची मर्जी राखिली पाहिजे, यांत आपला फार फायदा आहे. गोखल्यांची हाउस ऑफ कॉमन्समधील लोकांवर छाप पडली आहे, आणि माझ्या हिंदुस्तानविषयक भाषणाची त्यांनीं तरफदारी केली आहे.' ते पुढे लिहितात, 'He has a politician's head; appreciates executive responsibility, has an eye for the tactics of practical common sense.' गोखल्यांनी हिंदुस्तानास वसाहतीचें स्वराज्य प्राप्त करून घेणें हें आपले ध्येय आहे असें मोल यांस स्पष्टपणें सांगितलें. परंतु तत्त्वज्ञ मोर्लें काय म्हणतो पहा:— 'I eually made no secret of my conviction, that for many a day to come— long beyond the short span of time that may be left to us— this was a mere dream' वसाहतीचा दर्जा हिंदुस्तानास