राजीनामा ताबडतोब मंजूर करण्यांत आला. फुल्लर साहेब जेव्हां विलायतेंत मोर्ले यांच्या मुलाखतीस गेले तेव्हां ते म्हणाले, 'माझा राजीनामा मंजूर होईल असें माझ्या ध्यानीमनीही नव्हतें.' मोर्ले साहेबांनी पटकन् उत्तर दिलें, 'I don't believe it is for the good of prestige to back up every official whatever he does, right or wrong.' 'अधिकाऱ्याने कांहींही केलें तरी त्याची प्रतिष्ठा राहण्यासाठी त्याच्या प्रत्येक कृत्याचें समर्थन करणें इष्ट नाहीं.'
फुल्लर साहेब हिंदुस्तानांत हलकल्लोळ करीत असतांना, गोखल्यांनी इंग्लंडमध्ये त्यांच्या विरुद्ध चळवळ केली. अशा अधिकाऱ्यास कामावरून दूर करा अशी त्यांनी आग्रहाची निकडीची विनंति केली. या फुल्लर साहेबांबद्दल मोर्ले लिहितात-
"He was quite well-fitted for Government work of ordinary scope, but I fear, no more fitted to manage the state of things in E. Bengal than am I to drive an engine." 'माझी आगगाडीचा ड्रायव्हर होण्याची जितकी लायकी, तितकीच पूर्व बंगालचा कारभार पाहण्यासाठीं फुल्लरांची लायकी होती. सरकारचें साधारण काम मात्र त्यांस चांगले करतां आलें असतें.' स्वतः मोर्ले साहेबांचे जर हें मत तर हिंदुस्तानांतील लोकांचे या साहेबबहादुराराविषयीं काय मत झालें असेल?
फुल्लर साहेबांचें जरी स्वदेशीं प्रयाण झाले तरी बंगालची फाळणी पुढें बादशहा हिंदुस्तानांत येईपर्यंत रद्द झाली नाहीं. ही रद्द न होण्याचें कारण स्वतः कर्झन साहेबांनी दिले आहे. किचनेबरोबरच्या झगड्यांत कर्झन नामोहरम झाले. मानधन कर्झन राजीनामा देऊन गेले, त्यांस थोडाबहुत तरी संतोष व्हावा म्हणून, जिच्यासाठी कर्झनांनीं रात्रीचा दिवस केला, सर्व राष्ट्राचा विरोधही जुमानला नाहीं, अशी बंगालची फाळणी रद्द करण्यांत आली नाहीं. कर्झन साहेब जून ३०, १९०८ रोजी इंग्लंडमध्ये म्हणाले कीं, "That measure had been thrown as a sap to soothe my wounded feelings rather than on grounds of political propriety or expediency." मोर्ले साहेब ही
पान:ना. गोखले चरित्र.pdf/१५४
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२२
फुल्लर साहेबांची आरती.