नेतृत्वाखालीं तेथें बहिष्काराची चळवळ जोरांत चालू होती. या वाढत्या चळवळीचें अधिकाऱ्यांस वैषम्य वाटू लागणें साहजिक होते. लवकरच खुद्द वारिसाल येथें प्रांतिक सभा भरण्याचें घाटत होते. अविचारी लोक एक अडचण दूर करण्यासाठी दुसऱ्या हजार निर्माण करतात. सरकारचें तसेंच झालें. अत्यंत शांतपणें बारिसालच्या रस्त्यांतून पुढाऱ्यांची मिरवणूक चालू होती तरी पोलिसांनी पुढाऱ्यांचा अपमान केला. सन्मान्य लोकांवर काठीचा प्रयोग झाला. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेच्या हुकुमानें सुरेंद्रनाथांस गिरफदार करण्यांत आलें. मॅजिस्ट्रेटनें सुरेंद्रनाथांचा अपमान केला तेव्हां सुरेंद्रनाथांनी त्यांचाही केला. ताबडतोब सुरेंद्रनाथांस दंड ठोठावण्यांत आला. सभा बिगरपरवाना भरलेली असल्यामुळे, या सभेस हजर राहण्याबद्दल त्यांस दुसरा एक दंड ठोठावण्यांत आला. मॅजिस्ट्रेटनें दाखविलेला हा व्यक्तिद्वेष लोकांच्या मनांस जास्तच चिडविण्यास कारणीभूत झाला. परंतु येवढ्यानेंच काय झालें? इमर्सन साहेबांनी सभा उधळून लावली. हीं गाऱ्हाणीं फुल्लर साहेबांस दूर करितां आलीं असती. मागील आठवणी, व्रण बुजवितां आले असते. परंतु फुल्लरांनी फूस दिली. गुरखे आणि पोलीस शहरांवर सोडण्यांत आले. लोकांस दहशत घालणारी सरकारी अधिकाऱ्यांची भाषणे, कडक जाहीरनामे, शाळेतील विद्यार्थ्यांवर खटले यांचे सत्र सर्रहा सुरू झालें. हायकोर्टाच्या निकालांनीं, किंवा मोर्ले साहेबांच्या शिफारशींनी या गोष्टी कमी झाल्या नाहींत. परंतु इतक्यांत एकदम फुल्लर साहेबांनी राजीनामा दिला. या राजीनाम्याचा खुलासा मोर्लेसाहेबांनी आपल्या आठवणीत केला आहे. सिराजगंज येथील शाळांतील कांहीं विद्यार्थ्यांस बंडखोर वर्तणुकीबद्दल गुन्हेगार ठरविण्यांत आलें. ज्या शाळांत हीं मुलं होतीं त्या शाळांचा कलकत्ता युनिव्हर्सिटीशीं असलेला संबंध युनिव्हर्सिटीने तोडून टाकावा असें फुल्लर साहेबांनी युनिव्हर्सिटीला फर्मावले. या वेळेस हिंदुस्तान- सरकार मध्ये पडलें. युनिव्हर्सिटीचे नवीन कायदे होईपर्यंत थांबा असें हिंदुस्तान सरकारनें फुल्लरांस लिहिलें, परंतु फुल्लर फुगले. त्यांनी 'मी जसें लिहिलेले आहे तसे युनिव्हर्सिटीनें वागलेच पाहिजे, नाहीं तर माझा राजीनामा मंजूर करा,' अशी धमकी दिली. परंतु आश्चर्य हें कीं, त्यांचा
पान:ना. गोखले चरित्र.pdf/१५३
Appearance