Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२०
स्वराज्य नाहीं तर नाहीं पण निदान सुराज्य तरी द्या ?

plished in the past in this land. I fully believe that it is in the power of the Government to give a turn to this feeling which will make it a source of strength and not of weakness to the Empire. One thing, however, is clear. Such a result will not be achieved by any methods of repression. What the country needs at this moment above everything else is a Government, national in spirit, even though it may be foreign in personnel- a Government that will enable us to feel that our interests are the first consideration with it, and that our wishes and opinions are to it a matter of some account. My Lord, I have ventured to make these observations, because the present situation fills me with great anxiety. I can only raise my humble voice by way of warning, by way of appeal; the rest lies on the knees of the gods."
 या गोखल्यांच्या अर्थपूर्ण शद्वांचा मिटोंच्या मनावर योग्य तो परिणाम झाल्याविना राहिला नसेल असें आम्हांस वाटतें.
 कौन्सिलमधले काम आटोपून गोखले स्वतःच्या जबाबदारीवर पुनः तिसऱ्याने इंग्लंडला निघून गेले. मोर्लेमिंटोची कारकीर्द सुरू झाली होती. हिंदुस्तानास कांहीं तरी नवीन राजकीय हक्क मिळणार अशी दाट वदंता होती. गोखले १९०५ मध्ये जेव्हां इंग्लंडमध्ये होते तेव्हांच त्यांच्या मित्रांनीं त्यांस इंग्लंडमध्ये येण्यास सुचविले होते. त्या वेळेस त्यांनी सार्वजनिक अशीं भाषणे वगैरे केलीं नाहींत. त्यांचे काम आंतून- भेटी, मुलाखती यांच्या रूपानें- चाललें होतें.
 गोखले इंग्लंडला गेले परंतु इकडे हिंदुस्तानांत कोण हलकल्लोळ सुरू झाला! सर जे बॅम्फील्ड फुल्लर हे बंगालमध्ये दंडुकेशाही गाजवीत होते. दडपशाहीला ऊत आला होता. सरकार केवळ निष्ठुर बनलें होतें. या फुल्लर साहेबांच्या हाताखालचे अधिकारीही त्यांस शोभेसेच होते. इतक्यांत सर्वांचे लक्ष बारिसालकडे वेधलें. बारिसालमध्ये काय बरें चाललें होतें? बाबू अश्विनीकुमार दत्तांसारख्या लोकप्रिय पुढाऱ्यांच्या