आपला हेतु जाहीर केला तेव्हां बंगालचा फक्त एक कातळाच काढावा. असें त्यांच्या मनांत होतें. लोकांनीं त्या वेळेस फार गिल्ला केला, सभा भरविल्या. यामुळें कांहीं दिवस सर्वत्र सामसूम होतें. सरकारने फाळणीचा प्रश्न सोडून दिला असें लोकांस वाटलें. पण आंत खलबतें चालली होतीं. पडद्याआड कारस्थानें जोरांत सुरू होतीं. आणि १९०५ च्या आगस्ट महिन्यांत फाळणीची योजना जाहीर करण्यांत आली. लोकांनी ही योजना लुप्त व्हावी म्हणून आकाश पाताळ एक केलें. पूर्वीच्या कातळ्याऐवजीं आतां बंगालचा निम्मा तुकडाच काढण्याचें सरकारनें ठरविलें, सिव्हिल सर्व्हंटांची पोळी पिकणार होती यामुळे त्यांनी या योजनेस मोठ्या आनंदानें संमति दिली. सिव्हिल सर्व्हंटांचे मत विचारलें, परंतु बंगालमधील ज्या जमीनदारांस गोडगोड थापा देऊन सरकारने वेळोवेळी मदत घेतली होती त्या जमीनदारांस या प्रसंगी सरकारनें विचारलें होतें कां? गरज सरो आणि वैद्य मरो. हा विभागणी कायदा रद्द व्हावा म्हणून पांचशेंवर सभा भरल्या. लोकांचीं मनें दुखवूं नका; जनमताला कस्पटासमान लेखणें अंती हितपरिणामक व्हावयाचें नाहीं. असे जबाबदार पुढाऱ्यांनीं पुनः पुनः बजाविलें. येवढेच काय परंतु ज्या फुल्लर साहेबांनी पुढे लोकांवर गहजब केला ते फुल्लर साहेब या विभागणीच्या विरुद्ध होतें. साठ हजार लोकांच्या सह्यांचा अर्ज हाउस ऑफ कामन्सकडे करण्यांत आला. पार्लमेंटमध्ये कांहीं प्रश्नोत्तरे झाली. परंतु शेवटीं काय? कर्झनसाहेबांनी आपलेच खरें केलें! पार्लमेंटच्या शेवटच्या निकालाशिवाय ही योजना अंमलात येणार नाहीं असें दुखावलेल्या लोकांच्या मनास वाटत होतें. निराश होऊनही ते आशा करीत होते. परंतु '१६ आक्टोबर १९०५ पासून हा कायदा, ही विभागणी अंमलांत आणिली जाईल' असें सप्टेंबरमध्ये जाहीर झालें. सरकारचा सर्व लोकांस संताप आला. सर्व मतांचे बंगाली लोक एक झाले. राष्ट्रीय वृत्ति वावरू लागली. हें बोलून चालून परकी सरकार! त्यास आमची काळजी कशी असणार? तेव्हां सरकारवर बहिष्कार घालण्याचें ठरलें, ब्रिटिश मालावर बहिष्कार घालण्याचें अमलांत येऊ लागलें. राष्ट्रीय शिक्षणाच्या शाळा निघूं लागल्या. तरुण लोक सामर्थ्य कमावूं लागले! लाठीचे खेळ सुरू
पान:ना. गोखले चरित्र.pdf/१३९
Appearance