Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९०
ऑफिशिअल सीक्रेट्स ॲक्ट.

 दरवर्षीप्रमाणें १९०३ सालचें अंदाजपत्रकावरील भाषण झालें. परंतु या वर्षी महत्त्वाचे नवीन कायदे पास करावयाचे होते. ४ डिसेंबर १९०३ च्या बैठकीत 'ऑफिशिअल सीक्रेट्स ॲक्ट'वर- सरकारी गुपितांच्या कायद्यावर गोखल्यांनी सणसणीत टीका केली. १८८९ मध्ये हा कायदा सौम्य स्वरूपांत सिमल्यास पास झाला होता, कारण त्या वेळीं तेथें विरोध करण्यासच कोणी नव्हतें. कोणतेच हक्क त्या वेळेस मिळविण्यास लायक कायदेमंडळे नव्हती! हा 'सरकारी गुपितांचा कायदा' एतद्देशीयांसच निंद्य वाटला असे नव्हे तर इंग्लिशमनसारखें गोरें वर्तमानपत्र म्हणते :— "This bill is calculated to Russianize the Indian administration and it is inconceivable that such an enactment can be placed on the statute book even in India." या कायद्यानें हिंदुस्तानांत झारशाही सुरू होणार. कायदे पुस्तकाला या कायद्याचा विटाळही होऊ देऊ नये!' या वर्तमानपत्राचे जर हे शब्द तर आह्मां हिंदुस्तानवासीयांस या कायद्यावर टीका करण्यास कठोर असे शब्द तरी कोठें उरले? गोखल्यांसारख्या धिम्या, व शांत राहणाऱ्या माणसासही या बिलाचा संताप आला.
 The present bill proposes to make alterations of so astounding a nature in that Act (of 1889) that it is difficult to speak of them with that restraint which should characterise all utterances in this Chamber. 'या दिवाणखान्यांत मनास जिभेला जो लगाम घालावा लागतो, तो लगाम ओढून धरणें हें अशक्य झालें आहे' असे शब्द गोखल्यांनी काढले. आजपर्यंत लष्करी आणि आरमारी खात्यांमध्येच फक्त गुप्तपणा असे, आणि असे कायदे सर्वत्र असतात. परंतु दिवाणी खात्यांतही गुप्तता ठेवणें म्हणजे जगाविरहित वागणें होय. सर्व दिवाणी कारभारही लष्करी पद्धतीवर सरकार नेऊं पहात होतें. तालुक्यांतील तलाठ्यापासून तो गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलपर्यंत ज्या प्रश्नांची व्याप्ति असते त्या प्रश्नांसही लष्करी स्वरूप देणें म्हणजे अविचार व वेडेपणा यांचा कळस होय. या कायद्यांत आणखी एक विषारी दांत होता. जर कां सरकारचीं बिंगें वर्तमानपत्रकर्त्यांनी चव्हाट्या