पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/38

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माध्यमिक शिक्षणाचे जागतिक चित्र


 देशाच्या सामाजिक, आर्थिक विकासात माध्यमिक शिक्षणाचे स्थान निर्णायक नि महत्त्वाचे असते. सद्य:स्थितीत असे दिसून येते की जगभर माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्याचे कारण आपण शोधू लागलो की लक्षात येते की जगभर सर्वत्र सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाची अंमलबजावणी जाणीवपूर्वक करण्यात आली आहे. त्याचेच फलित म्हणजे माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी संख्येतील वाढ होय. ज्ञानविस्तार वृत्ती विकास आणि कौशल्यवर्धन या तीन उद्दिष्टांच्या संदर्भाने माध्यमिक शिक्षण महत्त्वाचे ठरते. जर तुम्हाला देशातील मनुष्यबळ उत्पादक आणि आरोग्यसंपन्न बनवायचे असेल तर माध्यमिक शिक्षण सार्वत्रिक करण्याशिवाय तरणोपाय नाही. आजमितीस अनेक देशांत कुशल तंत्रज्ञ व प्रशिक्षित मनुष्यबळाची वाण आहे. प्राथमिक शिक्षणातून ही गरज पूर्ण होत नसते. त्यासाठी उच्च माध्यमिक शिक्षण हे व्यवसायकेंद्री असणे अनिवार्य असते. जगभर असे दिसून आले आहे की ज्या देशात शिक्षणमान उंचावते, तेथील लोकांचे दरडोई उत्पन्नही वाढते. हे लक्षात घेता माध्यमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणास पर्याय उरत नाही.
 सन २००९ च्या उपलब्ध जागतिक आकडेवारीवरून असे लक्षात येते की प्राथमिक स्तरावरील 'सर्व शिक्षा अभियान' (Education for All) जगभर सक्षमपणे राबविल्याने जागतिक साक्षरता उंचावली. सन १९९९ मध्ये ८४% विद्यार्थीच प्राथमिक शिक्षण घेत होते. दशकभराच्या सातत्यपूर्ण जागतिक प्रयत्नांच्यामुळे हे प्रमाण २००९ मध्ये ९०% करण्यास आपणास यश आले. आपले उद्दिष्ट १००% चे असल्याने मधल्या काळात आपण शालाबाह्य १०% मुलांवर लक्ष केंद्रित केल्याने ९०% चे प्रमाण ९५% पर्यंत आपण करू शकलो असला तरी १००% चे उद्दिष्ट अद्याप

नवे शिक्षण, नवे शिक्षक/३७