पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/37

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यांत्रिक पद्धतीने झालेले हे विभाजन शिक्षणाचा दर्जा खालावणारे ठरले तर आश्चर्य वाटायला नको. या विभाजनाची कोणतीही तर्क संगत, शैक्षणिक श्वेतपत्रिका शासनाने प्रकाशित केलेली नाही. त्यामुळे या शिक्षण स्तराची पुनर्रचित आखणी महत्त्वाची आहे. उच्च माध्यमिक शिक्षण स्तरावर व्यावसायिक शिक्षण देण्याची, कल निश्चितीची कल्पना मोडीत निघाल्यात जमा आहे. जीवन गरजांवर आधारित शिक्षणाचे आकृतिबंध, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, शिक्षक पात्रता व प्रशिक्षण, संशोधन यावर जोवर आपण लक्ष केंद्रित करणार नाही, तोवर आपला जगातला क्रमांक शेवटून तिसराच राहणार. माध्यमिक पाठ्यपुस्तके तपभर न बदलण्याच्या आपल्या स्थितीशीलतेस काय म्हणायचे ?

•••


संदर्भ :-

 • mhrd.gov.in / rmsa
 • www.classhase.com / korea
 • Glnd.k12.va.us

नवे शिक्षण, नवे शिक्षक/३६