पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभंग. माझें आयुष्यहोवोऊन ॥ परिमजआवडोकीर्तन ॥ ३ ॥ तुका ह्मणेहाणी ॥ यावेगळीमनानाणीं ॥ ४ ॥ ( १३८) मुंगीयांच्याघरा कोणधाडीमूळ ॥ देखूनीपांगूळधांवघेती ॥ १ ॥ दुःखेंपीडीयेलाजायवैद्याघरा ॥ दुःखपरीहाराआपूलीया ॥ २ ॥ तुका ह्मणे कांरेनकरास्वहीत ॥ कारणहेप्रीतधरानामीं ॥ ३ ॥ ( १३९ ) डेंकणाचे संगें हीराजोभंगला || कुसंगैनाडलासाधुतैसा ॥ १ ॥ वोढाळाचे संगेसालीकनाडले ॥ क्षणएकनासलेसमागमें ॥ २ ॥ तुकाह्मणेधरासत्संगहावरा || चुकेलतोफेराचौऱ्यांशीचा ॥ ३ ॥ ( १४० ) ॥ आतांदेवाऐ साकरी उपकार || देहाचावीसरपडोमाझा ॥ १ ॥ तरीचजीवहा सुखपावेमाझा | बरवेंकेशवराजाकळों आलें ॥ २ ॥ ठावदेईंचित्ताराखेपायांपाशीं ॥ सकळवृत्तींशीअखंडीत ॥ ३ ॥ असे भयलाजचिंताकामक्रोध || तोडावासंबंधयांचामाझा ॥ ४ ॥ मागणेहेंदेवातुजएकआतां ॥ नाममुखींसंतसंगदेई ॥ ५ ॥ ( १४१ ) ॥ जरीझालाभाग्यवंत ॥ तरिकाभेटेलभगवंत ॥ १ ॥ उंचवाढलाएरंड || तरिका होइलइक्षुदंड ॥ २ ॥ जरीगर्दभवेगींधांवे ॥ तरिकाअश्वमोलपावे ॥ ३ ॥ तुका ह्मणेतोचीथोर ॥ ज्याचेमुखरघूवीर ॥ ४ ॥ ( १४२ ) विठोपंढरीच्याराया ॥ माझेंदंडवतपायां ॥ १ ॥ तुझे कृपेचें पोषणें ॥ माझासमाचारघेणे ॥ २ ॥ नामधरीपेलेंकंठीं ॥ असेअर्थबहुतपोटीं ॥ ३ ॥ माझेअंतरींचेंजाणा ॥ तुकाह्मणेनारायणा ॥ ४ ॥ ( १४३ ) हेंचिदानदेगादेवा ॥ तुझावोसरनव्हावा ॥ १ ॥ गुणगाईन आवडी ॥ हेचिमाझीसर्वजोडी ॥ २ ॥ नलगेमुक्तिधनसंपदा ॥ संतसंगदेईसदा ॥ ३ ॥ ६९