पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नामदेव. अभंग गोंदोबाचे. भावभक्तिवादे करावें कीर्तन | आशावद्धमनकरूंनये ॥ १ ॥ अन्नपाणीमनअवघानारायण || विठ्ठलावांचोनवालूंनये ॥ २ ॥ निष्क्र|में करायेंदेवाचेंकीर्तन || भयहें सांडून शरीर चें ॥ ३ ॥ रणामध्येंकै साभिडतोरणशूर || होवोनीउदारजीवावरी ॥ ४ ॥ तैसापांडुरंगींधराहोनिर्धार ॥ उतराहापारभवसिंधु ॥ ५ ॥ सिंधुउतरोनीलावाजगढःल || पाहाते नवलविठ्ठलाचें ॥ ६ ॥ देवजोडियेलातयाकायऊन ॥ गोंदाह्मणेमनधीटकरा ॥ ७ ॥ एकनाथ. समाधि शके १५४६-३० स० १६२४. याचे प्रसिद्ध ग्रंथ. एकनाथी भागवत शके १४९५. एकनाथीरामायण. रुक्मिणीस्वयंवर. स्वात्मसुख. वेंचे रामायणांतील. ओव्या. याउपरिकापकर्तव्यता || श्रीरामपुसेसमस्तां ॥ अवघेह्मणतीरघुनाया || युद्धतत्वतां करावें ॥ १ ॥ ससैन्यमारावेलंकानाथा ॥ विचारकायसापें आतां ॥ ऐसेंसमस्तींसांगतां || तेरघुनाथानमाने ॥ २ ॥ जेजेराजधर्मवि हित ॥ तेणेंचिसाधेपरमार्थ ॥ ऐसेधर्मरघुनाथ ॥ उपपादीतशास्त्रार्थं ॥३॥ अतिशपेंजोसमर्थ ॥ शिष्टधाडावालंकेत | ऐसेबोलतांरघुनाथ || कपि समस्तक्षोभले ॥ ४ ॥ आपुलीचोरूनिनेलीसीता ॥ आपणाचशिष्टपाठ वावाआतां ॥ हेंतंवअयुक्तरघुनाथा ॥ युद्धकरितांभयकाय ॥ ५ ॥ ऐसें बोलतांसमस्त || रामसांगे गजधर्मार्थ ॥ भूतदयापरमार्थ || समन्वित पपादी ॥ ६ ॥ युद्धधर्मचतुर्विध | सामदानदंडभेद || हेअनादिसिद्धप्र सिद्ध ॥ विशदभेदवर्णिले ॥ ७ ॥ युद्धसमयींसामानुक्रम | हाचिमुख्य वेंराजधर्म ॥ सामींभूतदयासंभ्रम ॥ सामचि होयपरमार्थ ॥ ८ ॥ सामन करितांजेजाण ॥ युद्धकरितातिदारुण || असंख्य मरतीप्राणीजन || हत्या कवणसोशील ॥ ९ ॥ ऐकोनिरामाचैवचन ॥ हनुमानूघालीलोटांगण |