पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूचना. या ग्रंथांत जे शब्द कठिण आहेत, ह्मणजे ज्यांचा अर्थ लौकर ध्यानांत यावयाजोगा नाहीं, असे प्राचीन काळचे शब्द आणि सं- स्कृत शब्द, बहुतेक निवडून काढून ते वर्णक्रमानें लिहून त्यांचा अर्थ दिक्प्रदर्शन करण्यापुरता थोडथोडा लिहिला आहे. ( प्राय: पर्याय शब्दांनी दाखविला आहे. ) ग्रंथ वाचतांना वाचणारास ज्या शब्दा- च्या अर्थाविषयों संशय पडेल तो शब्द त्यानें या कोशांत काढून पा हावा. ज्या शब्दांचा अर्थ मुळींच समजला नाहीं ते शब्द तसेच सोडले आहेत. पण असे शब्द फार थोडे आहेत. त्यांचा अर्थ ज्या- स समजत असेल किंवा शोध केल्याने समजेल त्यानें या कोशांत लिहून ठेवल्यास मोठा उपकार होईल.