पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभंग. रामदास. जन्मशक १५३० - इ. स. १६०८. समाधिशक १६०३-इ. स. १६८९. त्याचे प्रसिद्ध ग्रंथ. दासबोध. मनाचे श्लोक. स्फुट अभंग. वेंचे, रामदासाचे अभंगांतील. ( १ ) काया हे काळाची घेऊनीजाणार || तुझेनिहोणारकायबापा ॥ १ ॥ कायबापाऐ से जाणोनीनेणसी || मीमी ह्मणतोसीवायांवीण ॥ २ ॥ वायांवीण शीण केलाजन्मवरी ॥ दंभलोकाचारीनागवण ॥ ३ ॥ नागवणझालीपरलोकाजातां || स्वहीताची चिंताकेलीनाहीं ॥ ४ ॥ केलीनाहींचिंतानामींकानकोडें ॥ अंतींकोण्यातोडेजातआहे ॥ ५ ॥ जात आहेसर्वसांडूनिकरंटा ॥ जन्मवरीताठाघरोनीयां ॥ ६ ॥ धरोनीयांताटाकासयामरावें ॥ भजनकरावेदासह्मणे ॥ ७ ॥ ( २ ) सुखाचेसांगातीसर्वहीमीळती ॥ दुःखहोतांजातीनी घोनीयां ॥ १ ॥ निघोनीयांजाती संकटाचे वेळे || सुखहोतांमीळेसमुदाव ॥ २ ॥ समुदाव सर्वदेहाचेसंबंधी ॥ तुटलीउपाधीरामदासीं ॥ ३ ॥ ( ३ ) मूर्खतो संसारीमाझमाझेंकरी ॥ मृत्युबरोबरीहिंडतसे ॥ १ ॥ हिंडत से काळसांगातीसरीसा ॥ धरीभरंवसानेणोनीयां ॥ २ ॥ नेणोनीयांप्राणीसंसाराशीआला || आलातैसागेला दैन्यवाणा ॥ ३ ॥ दैन्यवाणागेलासर्वही सोडोनी ॥ ठेवीलेजोडोनीजनालागीं ॥ ४ ॥ लागलेलीमळीदोषाचीसूटेना ॥ आसक्तीतूटेनाअंतरींची ॥ ५ ॥