पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दुसऱ्या कोणा मादीबरोबर घरोबा करेल. पण या पहिल्या मादीचा तोटा केवढा ? तिने ते पिल्लू वाचवायचा आटोकाट प्रयत्न करायला हवा. म्हणजे कसेही करून पिल्लू वाढवण्यासाठी मदत करणारा दुसरा नर गटवायला हवा. आता या नराची कोंडी होणार. त्याच्या कष्टांनी जर भलत्याच नराची पिल्ले वाढणार असतील, तर याच्या वंशाची वृद्धी कशी होणार ? ती झाली नाही, तर याच्या जीन्स संपणार म्हणजेच आधी गाभण असलेल्या मादीच्या नादाला लागण्याची वृत्ती उत्क्रांतीमधे पुसून टाकली जाणार. तेव्हा नरांजवळ या कोंडीतून सुटण्याचा काहीतरी मार्ग असायला हवा. उंदरांमधे नराच्या शरीरातून एक प्रकारचे खात्र निर्माण होतात. त्यांच्या वासाने अशा मादीला गर्भपात होतो.
 पण नर पळून गेल्यानंतर काहीतरी करण्यापेक्षा नराच्या बीजपेशीचा स्वीकार 'करण्याआधीच त्याच्याकडून संगोपनाची कामे करून घेतली तर ! मग मादीच्या वंशवृद्धीची खात्री वाढेल. उदाहरणार्थ, नरांकडून घर बनवून घेता येईल. गवळणींची घरटी त्यांचे नर विणतात. नर घरट्यांना टांगून पंख फडफडावून जाहिरात करतात. मग मादी हळूच येते. चोचीने घरट्याची गुंफण उचकटून पाहते. घरटे भक्कम असले, पसंत पडले, तर आत जाते. पाठोपाठ नर जातो आणि मग समागम होतो. स्टिकलबॅक या जातीचा मासा पाण्याच्या तळाशी घरटे तयार करतो आणि मग त्या घरात मादीने अंडी घालावीत म्हणून तिची आळवणी करतो किंवा नराकडून अन्न गोळा करून घेता येईल किंवा नराला बराच वेळ आपल्यामागे नाचायला लावून त्याच्या सचोटीची परीक्षा बघता येईल. एक अतिरेक म्हणजे काही कोळी आणि किडे यांच्यात नराला मादी समागमानंतर खाऊनच टाकते. एवीतेवी शुक्रजंतू दिल्यानंतर त्याचे काम संपलेलेच असते, नंतर तो मदत करणार नसतोच. मग अन्न गोळा करण्याचे कष्ट तरी थोडे वाचू देत. आणखी एक म्हणजे पिल्लू नरावर सोपवून आपणच निघून जायचे. पण हे कसे घडणार ? नर भाधी मोकळा होतो. मादी नंतर. समजा, मादी आधी मोकळी होत असली तर ? जलचर सृष्टीमधे हे घडू शकते.

 अनेक मासे पाण्यामधे अंडी अन् शुक्रजंतू सोडून देतात. पाण्यातच ती अंडी फलित होतात. जमिनीवर हे शक्य नसते. कोरड्या वातावरणात बीजपेशी टिकू शकत नाहीत. म्हणून त्यांचा संयोग शरीराच्या आतच व्हावा लागतो. मासे या बंधनातून

६८ / नराचा नारायण