पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असतील तर अशा धक्क्याने ती चिकटून खंडित प्रवाह पुन्हा सुरू होतो. पण हे अपवादात्मकच गुणबदलांचे तसेच आहे. आणि एकदा गळ्यात पडलेले गुण- बदल फेकून देता येत नाहीत. घड्याळामधे दातेरी चाक अडवणारे कुत्रे असते. चाक पुढे जात असेल, तोवर हे कुत्रे आड येत नाही. पण चाक उलटया दिशेने फिरू पाहील, तर हे कुत्रे त्याला थांबवते. त्याचप्रमाणे नवे हानिकारक गुणबदल होणे जास्त शक्य असते. पण गुणत्रदलाची दुरुस्ती होणे फार दुरापास्त. उलट लैंगिक पद्धतीने बीजपेशींचा संयोग झाला, की एका बीजपेशीतील हानिकारक गुणबदलांवर (जीन्सवर) उतारा म्हणून काही जीन्स दुसऱ्या बीजपेशीकडून मिळण्याची शक्यता असते. पण लैंगिकमेदाच्या निर्मिती आणि प्रसारामधे या सगळ्या गोष्टींचा वाटा किती, हे कोणाला ठामपणे सांगता आलेले नाही.
 नराची बीजपेशी (शुक्रजंतू ) लहान असल्यामुळे नराला नेहमीच मादीपेक्षा कितीतरी पट जास्त बीजपेशी बनवता येतात. एका नरापासून अनेक माद्यांना गर्भ- संभव करून घेणे शक्य असते. संख्या वाढण्यावर मर्यादा पडते ती माधांमुळे. जर नर कमी आणि माद्या जास्त अशी रचना केली तर संख्या वाढेल. पण प्रत्यक्षात मात्र सगळीकडे नर आणि माद्यांच्या संख्येची साधारण बरोबरी असते. हे कोडे उलगडण्याचे काम रॉनल्ड फिशर या संख्याशास्त्रज्ञाने केले. समजा, नर खूप कमी आहेत आणि माद्या जास्त. म्हणजे सरासरीने बघता एका नराला एका मादीपेक्षा जास्त पिल्ले असतील. किंवा प्रत्येक नराच्या जीन्स जास्त पिल्लांमधे असतील. म्हणजे या नरांचे जे आईबाप असतील, त्याच्या जीन्सचा प्रसार नातवंडांच्या पिढीमधे जास्त असेल, तेव्हा नर पिल्लू होण्याला अनुकूलं जीन्सची प्रगती होऊ लागेल, म्हणजेच नरांची संख्याही वाढू लागेल. असाच युक्तिवाद माद्या कमी असतील, तर करता येईल. यातून शेवटी नर आणि माद्या यांचे प्रमाण बरोबरीवर येईल. यातून आणखी एक मुद्दा स्पष्ट होतो. जीन्सच्या प्रसाराच्या प्रक्रियेत प्राण्यांच्या एकूण संख्येच्या वाढीला मदत होईलच असे नाही. ही संख्या शक्य तितकी जास्त वाढण्याकरता कमी नर आणि खूप माधा असे प्रमाण उपयुक्त ठरले असते. पण उत्क्रांतीतून ही निष्पत्ती होऊ शकत नाही.

 नर आणि माधा यांची संख्या साधारण सारखी असल्यावर त्यांचे परस्पर संबंध

तुझ्यावाचून करमेना / ६५