पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सापडेल. या पेशी अन्नासाठी दुसऱ्या पेशीला गिळून टाकतात. कदाचित काही वेळा, ही गिळंकृत केलेली पेशी पचली जाण्यापूर्वीच तिची रंगसूत्रे भक्षक पेशीच्या केंद्र- स्थानी जाऊन स्थिरावली असतील. त्यांना मूळ रंगसूत्रांच्या बरोबरीने स्थान मिळाले असेल. ( व्हायरस हे सूक्ष्मकण बॅक्टीरियाच्या केंद्रस्थानात अशी घुसखोरी करतात हे शास्त्रज्ञांना दिसून आले आहे. ) आणि अशा संकरामुळे काहीवेळा उपयुक्त गुण- धर्मांचा लाभ होतो हे आपण पाहिलेच आहे. त्यामुळे स्वजनाहारी पेशींची वंशवृद्धी इतरांपेक्षा जास्त वेगाने झाली, तर त्यातून विघटनाऐवजी संयोगाने पुनरुत्पत्ती होण्याकडे कल वाढला असेल.
 कारण काही का असेना, पण दोन बीजपेशीच्या एकत्रीकरणातून नवा जीव घडणे हाच नियम असे धरून चालू. मग पुढे या दोन जीवपेशीतील एक अन्न- साठा करणारी आणि दुसरी न करणारी अशी वाटणी का झाली? समजा, आधी त्या बुरशीप्रमाणे दोन्ही बीजपेशी सारख्याच असतं. पुढे गुणबदलाने काही बीजपेशी जास्त अन्नसाठा करू लागल्या असतील. त्यांचा आकार वाढला असेल. त्यामुळे त्यांच्यापासून निर्माण होणारा जीव प्राथमिक अवस्थेतच मरण्याची शक्यता घटली असेल. म्हणून मोठी बीजपेशी घडवणाऱ्या जीन्सचा प्रसार होऊ लागला असेल. गुणबदलाने छोट्या बीजपेशीसुद्धा बनत असणारच. पण सामान्यपणे त्यांच्यापासून उत्पन्न होणारा जीव उपासमारीने मरत असेल. म्हणून अशा जीन्स निःशेष होत असतील. पण आता छोट्या बीजपेशींना बराच अन्नसाठा करणाऱ्या मोठ्या बीजपेशी मेटल्या, तर ही अडचण राहणार नाही. मात्र याकरता त्या छोट्या बीजपेशीमघे संयोगासाठी मोठी बीजपेशी शोधण्याचे सामर्थ्य असले पाहिजे. त्यामुळे हालचालीला योग्य असा शेपटासारखा अवयव मिळालेल्या छोट्या बीजपेशी यशस्वी होत असतील. नर-मादी फरकाचा हाच आदिकाल म्हणायला हवा.

 दोन बीजपेशींच्या संयोगातून नवीन जीव घडण्यामधे एक खास फायदा आहे. पेशींच्या विभाजनातून जीव घडताना तोचतोपणा फार येतो. फरक कधी पडणार ? योगायोगाने गुणबदल झाल्यासच आणि बरेचदा हे गुणबदल हानिकारकच असतात. एखाद्या गुंतागुतीच्या नाजूक यंत्राला धक्का मारून त्याच्यात सुधारणा होण्याची शक्यता किती ? फारच थोडी. क्वचित विजेच्या दोन तारांची बांधलेली टोके सुटली

६४ / नराचा नारायण