पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आकाराने मोठे असते. नराची बीजपेशी म्हणजे शुक्रजंतू. हा आकाराने बराच लहान असतो. आता लहान, मोठा हे शब्दसुद्धा सापेक्ष आहेत. शहामृगाचे अंडे नारळाएवढे असते. बदकाचे अंडे रांगत्या मुलाच्या मुठीएवढे असते. मासोळ्यांची अंडी मोहरी- एवढी असतात. माणूस हा एवढा मोठा प्राणी. पण त्याच्या मादीचे अंडे या सर्वांपेक्षा लहान. सूक्ष्मदर्शकातून बघण्याजोगे. पुरुषाचा शुक्रजंतु तर त्याहूनही लहान. त्याच्या ४६ रंगसूत्रांपैकी निम्म्या म्हणजे २३ रंगसूत्रांचे अतिसूक्ष्म गाठोडेच आणि स्त्रीच्या शरीरातील अंड्यापर्यंत पोहत पोचण्यासाठी एक छोटेसे शेपूट. अंड्यामधील रंगसूत्रांची संख्याही तेवीसच आणि त्यांचेच महत्त्व जास्त. कारण गर्भाचे सर्व गुणधर्म ती रंगसूत्रे ठरवणार. मग अंडे मोठे का ? तर रंगसूत्रांबरोबरच गर्भाच्या आयुष्याच्या सुरुवातीला आवश्यक असलेले अन्नसुद्धा त्यातच साठवलेले असते म्हणून. कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला तीन आठवडे लागतात. तेवढ्या दिवसांची त्या जीवाची शिदोरीच अंड्यात असते. शिवाय रक्षणासाठी वर कवच. तेव्हा मोठी बीज- पेशी ज्या शरीरात बनते ती मादी आणि छोटी बीजपेशी बनवतो तो नर अशी व्याख्या आपण करू या.

 हा फरक पहिल्यापासून होता का ? की उत्क्रांतीच्या वाटेवर कधीतरी निर्माण झाला ? तसे असेल तर त्याचे कारण काय ? या प्रश्नांची उत्तरे अजून निर्णायकपणे दिली गेलेली नाहीत. पण थोडाफार रास्त तर्क करता येतो. एक म्हणजे, ज्या प्राण्यांत समागमातून उत्पत्ती होते, पण आपल्या व्याख्येप्रमाणे लिंगभेद नाही, असे जीव निसर्गात दिसतात. काही प्रकारच्या बुरशीमधे नर आणि मादी असा फरक नसतो. कोणाचाही कोणाशीही समागम ( 1 ) होऊ शकतो. म्हणजे दोन्ही जीव निम्मी निम्मी रंगसूत्रे असलेल्या दोन अगदी सारख्या बीजपेशी देतात. त्या एकमेकात विलीन होऊन नवीन जीव जन्माला येतो. पॅरामीशियम या एकपेशीय सूक्ष्मजीवाच्या बाबतीत तपशिलाच्या थोड्या फरकाने हेच घडते. यांच्यात दोन गट असतात. एकाच गटातले दोन जीव आपसात पुनरुत्पत्ती करू शकत नाहीत. पहिल्या गटातला एक आणि दुसऱ्या गटातला एक असे दोन जीव जवळ येतात. प्रत्येकाच्या केंद्र- भागातून निम्मी रंगसूत्रे दुसन्याकडे धाडली जातात. या प्रकारच्या क्रियेचे मूळ कदाचित खजनाहारी (कॅनिबल, आपल्याच जातीचा प्राणी खाणारे) पेशींमधे

तुझ्यावाचून करमेना / ६३