पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्पेन्सरने चूक केली असे मला वाटत नाही. विशिष्ट गुणधर्मांचे प्रमाण कमीजास्त होणे हा अर्थ या सिद्धांतास अभिप्रेत आहे. शिक्षगाचा मूळ सिद्धांतच मुळी, जीनोटाईप आणि वातावरण यांच्या क्रिया प्रक्रियातून होणाऱ्या आंतरविचलनाच्या स्थैर्यातून माणसाला पुढे असणाऱ्या आव्हानाला तयार करणे हा होय.

तिसऱ्या ते आठव्या प्रकरणात एकामागून एक, मुळात विविधता का निर्माण होते, परिस्थितीशी जुळवून घेणारांची वंशवृद्धीला कशी मदत होते आणि त्यातील क्रिया किती कौशल्याने यंत्रवत् घडून येतात, पुनरुत्पत्तीकरिता कशा तऱ्हेची समाजरचना लागते आणि कोणते गुणधर्म माणसांत लागतात, उत्क्रांतीबरोबर अनुवांशिकतेच्या तत्त्वाचा आपल्या फायद्यासाठी माणसाने कसा उपयोग केला आणि जास्त पैदास होणारी पिके अन् प्राण्यांच्या जाती शोधून काढल्या, अनुवांशिकतेचे तत्त्व स्वतःवर कसे वापरता येईल आणि या विचारातून Eugenics चा जन्म कसा झाला नि fascism ची कल्पना कशी रुजली, रशियन नेत्यांनी अनुवांशिकताशास्त्राकडे समाजाच्या प्रगतीचे शक्तिमान साधन म्हणून कसे पाहिले, निर्जीव पृथ्वीवर जीवाचे पदार्पण कसे झाले, वगैरे प्रश्नांवर विचार मांडले आहेत. या सर्व प्रकरणांत विषयातील पारंगतता, मांडणी अन् लिखाणाची शैली इतकी उत्कृष्ट आहे की, पुस्तक एकदा हाती धरले की त्याचा अभ्यास केल्याशिवाय ते बाजूला ठेववत नाही. आपल्या मनोगतात गोरे म्हणतात की, ते जीवशास्त्रज्ञ नाहीत, पण पुस्तक वाचल्यानंतर हे त्यांचे विधान कितपत खरे मानायचे याची शंका येते. मानवशास्त्र, जीवशास्त्र, अनुवांशिकता आणि संख्याशास्त्र या चारही विषयात ते तज्ज्ञ आहेत, असाच वाचकांचा अभिप्राय असेल.

मला जी दोन प्रकरणे सर्वात आवडली ती म्हणजे नववे आणि दहावे. पुन्हा पुन्हा ही प्रकरणे वाचावीशी वाटतात. माणसाने पहिली भरारी मारली ती भाषेच्या जोरावर. पण भाषा तर अनुवांशिक नाही म्हणजे ती आपोआप यंत्रवत माणसाला येत नाही. ती शिकून येते आणि ती शिकण्यास योग्ध ते वातावरण लागते. मुलाला घरातील संभाषण ऐकू न येईल अशा तऱ्हेने वाढवा की प्रत्ययाला येईल की मुलाला बोलता येत नाही. अनिल गोरे म्हणतात त्याप्रमाणे स्वरयंत्र आणि मेंदू यांच्यातून भाषा जन्माला आली; म्हणजेच वातावरण आणि माणूस यांच्या क्रियाप्रक्रियेतून वातावरण योग्य असेल तर माणसाला स्वतःशी म्हणजेच शरीर नि मन यांच्यात संवाद साधता येतो. गरज [ नीड ] आणि लोभ [ ग्रीड ] यातील फरक कळू लागतो अन् त्यातून विचार आणि विवेक उत्पन्न होऊन जरूर तो 'फीड बॅक' मिळतो. या अंतःशक्तीचा उपयोग करून माणूस आपल्या वृत्तीत परिणामकारक बदल घडवून आणू शकतो. शिक्षणाचा मूळ पाया या विचलनाच्या स्थैर्यात

आहे. म्हणूनच शिक्षणात योग्य तो फेरफार केल्यास व्यक्तिमत्त्व तयार करण्याचा आणि

नऊ