पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 छातीची पोकळी समुद्रसपाटीच्या १०५०० घन सेंटीमीटर पासून, ३३०० मीटर उंचीवर ११००० व ४५०० मीटर उंचीवर १२००० घन सेंटीमीटर इतकी वाढलेली आढळते. लालपेशींचे प्रमाण वाढल्यामुळे रक्त घट्ट होते आणि त्याचा प्रवाह चालू ठेवण्यासाठी हृदयाला जास्त काम करावे लागते. म्हणून खूप उंचीवर राहणाऱ्यांच्या हृदयाचे स्नायू अधिक बळकट असतात.
 हे फरक काही अंशी जन्मजात असतात, अनुवांशिक असतात तर काही अंशी उंचावरील परिस्थितीमुळे झालेले असतात. आपण खूप उंचावर जाऊन राहिलो तर आपल्या रक्तातील लाल पेशींची संख्याही थोडी वाढेल. तेवढा लवचिकपणा शरीर रचनेत असतो, पण पिढ्यानपिढ्या उंचावर राहिलेल्या तद्देशियांइतकी ती वाढणार नाही.

 उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून प्राण्यांमधे निर्माण होणाऱ्या अनुरूपतेची विविध रूपे आपण पाहिली. डार्विनच्या तर्कशास्त्राचे वैशिष्ट्य असे की, प्राण्याचे गुणधर्म पाहून ते तसे का घडले असतील याचा या तर्कशास्त्रातून विचार करता येतो. तसेच परिस्थितीत अमुक बदल झाला तर जीवसृष्टीचा काय प्रतिसाद असेल याचे एका मर्यादेपर्यंत तरी भाकित करता येते. पण डार्विनला अजिबात न उलगडलेले मूळ कोडे म्हणजे जीव- सृष्टीची सुरुवात कशी झाली ? पहिला जीव कसा घडला ? आधी पृथ्वी हा तप्त रसांचा गोळा होता. तो हळूहळू थंड झाला. पण दीर्घकाळ या ग्रहावर कार्बन, सल्फर, फॉस्फरस, लोह अशा मूलद्रव्यांचा रटरटणारा रस्सा असेल. मिथेन, अमोनिया, हाय- ड्रोजन असे वायू असतील. त्यावर प्रचंड शक्तीच्या विश्वकिरणांचा मारा होत असेल. यात ' यथा काष्ठं च काष्ठंच ' पद्धतीने मूलद्रव्यांचे अणू (अॅटम ) एकत्र येऊन संयुगांचे रेणू (मॉलिक्यूल) बनत असतील आणि मोडत असतील. असे रौद्रभीषण नाट्य चालू असताना, अब्जावधी वेळा संयुगे बनण्याच्या क्रिया होत असताना, योगायोगाने एक अभूतपूर्व प्रकारचा रेणू घडला असावा. काय त्याचे वैशिष्ट्य ? हा. रेणू रश्श्यामचे तरंगत असताना अनेक सुटे अणू येऊन त्याला धडकत असतील. या रेणूची शक्ती अशी की, त्याच्या कोणत्याही अणुवर दुसरा तसाच अणू आपटला की तो चिकटावा. अशा प्रकारे या रेणूची दुसरी प्रत तयार झाली की, ती मूळ रेणू- पासून वेगळी व्हावी. हाच पहिलावहिला जन्म. जीवाचा हुंकार. जन्ममृत्यूच्या संसार-

५६ / नराचा नारायण