पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गेले की, पुन्हा होत नाहीत. त्या रोगजंतूंचा सामना करू शकतील अशी रसायने (अँटिबॉडीज ) शरीर तयार करते. म्हणजे इथे अनुवांशिक गुणधर्म 'अमुक रसायन तयार करणे' हा नसून 'विशिष्ट जंतू शरीरात शिरल्यास विशिष्ट रसायन बनवणे ' हा आहे. याचा फायदा घेऊन आपण मुद्दामच शरीरात नमुन्यादाखल जंतू सोडतो. हीच ती लस. या आक्रमणामुळे शरीरातील रक्षक जागे होऊन कडेकोट बंदोबस्त करतात. आता साथीला घाबरायचे कारण नाही. या तंत्राच्या वापराने भापण देवी हा रोग समूळ नष्ट केला. अशा तन्हेने परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असलेल्या रचनेचे अनुभव आपण पदोपदी घेतो. आपल्या पायाचे तळवे जाड कातडीचे असतात, पण हाताचे पंजे मात्र मऊ, पण कष्ट करावे लागले तर हाताला लगेच घट्टे पडतात. हस्तांदोलन करून आपण ओळखू शकतो, माणूस कष्टकरी आहे की, बशाभाऊ ते. फार उंचीवर राहणाऱ्या माणसांना विरळ हवेला तोंड द्यावे लागते. ४००० मीटर उंचीवर आपण गेलो तर एका श्वासात समुद्रसपाटीच्या तुलनेने फक्त ६०% प्राणवायू मिळतो. तरीसुद्धा हिमालयावर किंवा दक्षिण अमेरिकेत अँडीज पर्वतावर माणसे अशा उंचीवर टिकून आहेत. वस्तुतः कमी प्राणवायू मिळाल्यामुळे दमणे, धाप लागणे वगैरे घडून शक्तिपात व्हायला हवा. पण ही माणसे सर्वसामान्य आयुष्य जगताना दिसतात हे कसे ? विरळ हवेत जगण्यासाठी दोन-तीन गोष्टी करता येतील. श्वास घेताना फुप्फुसांना प्रसरणासाठी अधिक मोठी पोकळी उपलब्ध करून द्यावी म्हणजे एका वासात जास्त हवा मिळेल. रक्तातील लालपशींची संख्या वाढवावी म्हणजे अधिक प्राणवायू शोषला जाईल. किंवा लालपेशींमधील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवावे. त्यामुळेही प्राणवायू शोषण्याची क्रिया जास्त क्षमतेने घडेल, प्रत्यक्षात या तीनही गोष्टी घडलेल्या दिसतात. एका अभ्यासकाने निरनिराळ्या उंचीवर राहणाऱ्या माणसांची याबाबतीत तुलना केली. त्याचे निष्कर्ष पुढील तक्त्यात दिले आहेत.
उंची समुद्रसपाटी ३००० मी. ४००० मी. ५००० मी. १०० घन सें. मी. रक्तातील हिमोग्लोबिन (ग्रॅममधे ) १६ १६.८५ १८.८२ २०.७६ एक घन मि. लिटर रक्तातील लालपेशी (लाखात) ५.१४ ५०६५ ५०६७

६-१४

अनुरूपता / ५५