पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होते. १९८१ सालच्या नाताळच्या दिवसात अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्याजवळ निसर्गात काही वादळी बदल घडले. त्यांना शास्त्रज्ञांनी अल् निन्यो ( ख्रिस्ताच्या जन्मवेळेलाच आलेले बाळ) असे गोंडस नाव दिले. या वेळी अॅटलांटिक महासागरा- तील गरम पाण्याच्या प्रवाहाच्या नेहमीच्या दिशा बदलल्या. जिथे गार पाणी असा- यला हवे तिथे गरम आले. याचे अनेक परिणाम झाले. तळातून अन्नकण वर येण्याची प्रक्रिया थांबली. फायटोप्लँक्टन आणि झुप्लँक्टन हे सूक्ष्मजीव मरून गेले, त्यांच्या- वर जगणारे मासे मेले. माशांवर जगणारे पक्षी संपले, मासेमार भिकारी झाले. समुद्राच्या पोटात हजारो चौरस किलोमीटर पसरलेल्या प्रवाळ खडकांमधे ( कोरल रीफ) स्मशानवत स्थिती झाली. प्रवाळ (पॉलिप ) हे अर्धे सूत ( १ १६ इंच) लांबीचे सूक्ष्मजीव. ते लाखांनी एकत्र राहतात. त्यांच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या द्रव्यातून चुनखडीचे खडक बनतात. प्रवाळांची. प्रत्येक पिढी अक्षरशः जुन्या पिढीच्या खांद्या- वर बसून खडकाचा नवीन थर बनवत असते. प्रवाळखडक हे मासे, वनस्पती आणि इतर अनेक जीवांचे महत्त्वाचे विश्रांतिस्थान आहे. हे प्रवाळ विशिष्ट जातीच्या अल्लो ( शेवाळ ) या वनस्पतीशी संधान बांधून असतात. प्रवाळांकडून या वनस्पतींना पोटॅ - शिअम, फॉस्फरस अशी 'खते' मिळतात तर अल्गे प्रवाळांना अन्न देतात. पण तपमानाच्या बाबतीत अलगे फार नाजूक असतात. अल् निन्योमुळे पाण्याचे तपमान वाढल्यावर प्रवाळ खडकांवरचे अल्गे निघून गेले. प्रवाळांचेही आयुष्य मग लगेचच संपते. तात्पर्य, परिस्थिती बदलली तर पूर्वी यशस्वी ठरलेली यंत्रणा कामी येतेच असे नाही. म्हणूनच निसर्गाच्या संतुलित रचनेमधे माणसाने ढवळाढवळ करण्यामुळे निरनिराळ्या जीवांच्या परस्परसंबंधांचे गोफ तटातट तुटण्याचा धोका असतो. त्यांची निसर्गतः परत गुंफण व्हायला फार दीर्घकाळ लागण्याची शक्यता असते.

 तळ्यांमधले काही मासे, तळे आटून गेले तर आतल्या ओलसर चिखलात बुडी मारून राहतात. पुन्हा पाणी आले की हातपाय हलवायला सुरुवात ! थंड प्रदेशात बर्फ पडू लागल्यावर अनेक प्राणी, वनस्पती झोपी जातात. मृतवत् होतात. त्यांच्या शरीराच्या बहुतेक सर्व क्रिया जवळजवळ थांबल्यासारख्या होतात. अन्नाचीसुद्धा गरज पडत नाही. बरेच एकपेशीय प्राणी ( उदा. भारतीय माणसाला आयुष्यभर आव या रोगाचा त्रास देणारा अमीबा ) परिस्थिती प्रतिकूल झाली तर स्वतःभोवती चिलखती

५२ / नराचा नारायण