पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे असे म्हटले पाहिजे. पारशी जमातीतही या आजाराचे प्रमाण लक्षणीय आहे.
 निसर्गामधे भक्षक आणि भक्ष्य यांचा कसा लपंडाव चालतो हे आपण पाहत होतो. हा लपंडाव अर्थातच आजूबाजूच्या परिस्थितीच्या संदर्भातला असतो. संदर्भ बदलला की, खेळी बदलावी लागते. इंग्लंडमधे काही गोगलगायींच्या पाठीवर रंगीत शंख असतात. यश नावाचे पक्षी गोगलगायी पकडून दगडावर आपटतात अन् शंख फुटून गेल्यावर मांसल शरीर गिळंकृत करतात. रंगीबेरंगी गोगलगायी वसंतऋतूतील रंगीबेरंगी परिसरात, गवतात लपून जातात तर पार्श्वभूमी एकाच रंगाची असली म्हणजे जास्त उठून दिसतात. या तर्काच्या जोरावर कोणत्या काळात कोणत्या रंगाच्या गोगलगायी जास्त दिसतील याचे भाकित करता येते. आणि हे थ्रश पक्षी नाहीसे झाले तर ? तर मग रंगाचा अनुरूपतेवर परिणाम होणार नाही आणि एरवी शिल्लक न राहणारे रंग दिसू लागतील. ऑस्ट्रेलियात सशांना मारणारे प्राणी नव्हते. तेव्हा त्यांच्यामधे युरोपात न दिसणाऱ्या रंगछटा दिसू लागल्या. अमेरिकेत मैदानी प्रदेशा- तल्या उंदरांमधे वेगवेगळे रंग असतात. उंदराचा रंग मातीशी काँट्रास्ट असेल तर तो उठून दिसतो आणि घुबडांकरवी त्याची शिकार होते. म्हणून मातीशी मिळत्याजुळत्या रंगाचेच उंदीर सापडतात. गडद रंगाच्या मातीत गडद रंगाचे उंदीर तर फिक्या रंगाच्या मातीत फिकट रंगाचे उंदीर. थंड प्रदेशात आसमंत हिवाळ्यात पांढरा असतो तर उन्हाळ्यात करडा, म्हणून सशासारखे प्राणी आपला रंगही ऋतुकालानुसार बदलतात. काही सरडे आणि काही मासे तर क्षणात आपला रंग बदलतात. म्हणून बिनभरवशाच्या टोपीबदलू माणसाला सरड्याची उपमा देतात.

 शिकार करण्याच्या अनेक तन्हा आणि भक्षकाला फसवण्याच्या हिकमती ही रंजक वर्णने वाचताना एक मूलभूत मुद्दा नजरेआड होऊ देता कामा नये. यातली कोणतीही गोष्ट प्राण्यांनी समोरच्या परिस्थितीचा थंडपणे विचार करून केलेली नसते. त्यांना दुसरा पर्यायच नसतो. त्यांच्या जीन्सनी दिलेल्या हुकुमानुसार ही यंत्रवत् कृती घडते. परिस्थितीच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून नव्हे. योगायोगाने, अपघाताने गुणबदल होऊन या गोष्टी शक्य होतात. हा मुद्दा एका साध्या प्रयोगाने जास्त स्पष्ट होतो. पेनिसिलिन आणि बुरशीच्या इतर अनेक जाती तऱ्हेतऱ्हेच्या जंतूना मारक ठरतात. समजा एका काचेच्या बशीमधे ( पैट्री डिश ) बॅक्टीरियांना

अनुरूपता / ४९