पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाही. मलेरिया पुन्हा हातपाय पसरतोय. ही प्रक्रिया सहविकासाचीच आहे.

 मलेरियाविषयी बोलताना उत्क्रांतीच्या संदर्भात ' सिकल सेल 'बद्दल सांगायलाच हवे. सिकल सेल म्हणजे विळ्याच्या किंवा चंद्रकोरीच्या आकाराची पेशी. माणसाच्या रक्तातल्या लाल पेशी गोल असतात. त्यात हिमोग्लोबिन नावाचे प्रोटीन असते. फुप्फुसातून प्राणवायू गोळा करून शरीराच्या इतर अवयवांपर्यंत नेण्याचे काम हिमो- ग्लोबिनमुळे होते. हे प्रोटीन बनवण्याचा हुकूम देणारी जी जीन आहे तिच्यात बिघाट ( गुणबदल ) झाला तर हिमोग्लोबिनचा एक अनवट प्रकार तयार केला जातो. या प्रोटीनकडून प्राणवायूवहनाचे काम नीट होत नाही. आणि या प्रोटीनने युक्त लाल पेशी चंद्रकोरीसारख्या दिसतात. अशा माणसांना पंडुरोग, मेंदूतील रक्त- tara वगैरे व्याधी होतात. आई-बाप दोघांकडून सिकल सेलसाठी जबाबदार जीन मिळणारी मुले बव्हंशी दगावतात. एकच सिकल सेल जीन मिळणारी मुलेसुद्धा अधू सतात. अशी ही अहितकारक जीन, ज्या शरीरात ती वास्तव्य करते त्याला इजा करणारी जीन मनुष्य जातीत टिकून कशी राहिली ? ती केव्हाच लुप्त व्हायला हवी होती. याचे रहस्य असे की ही जीन एका विशिष्ट प्रकारच्या मलेरिया जंतूपासून ( प्लाझमोडियम फाल्सिपेरम्) संरक्षण देते. इतर माणसे मलेरियाने खच्ची होत असताना हा सिकल सेलवाला मनुष्य टवटवीत असतो. अशा तऱ्हेने मलेरियामुळे सिकल सेलवाली माणसे आणि इतर यांच्यात संतुलन राखले जाते. जर मलेरिया हा रोग जीवघेणा असता तर फक्त सिकल सेलवाले लोकच जिवंत राहिले असते. उलट मलेरिया अदृश्य झाला तर सिकल सेलवाल्या लोकांचे प्रमाण घटत जाईल. पश्चिम आफ्रिकेत हे प्रमाण वीस टक्के आहे. इथूनच सगळे गुलाम अमेरिकेत गेले. तिथे मलेरिया नाही. त्यामुळे तिथल्या निग्रोंच्या लोकसंख्येत दर पिढीला सिकल सेलवाल्या माणसांचे प्रमाण घटत गेले. आज ते नऊ टक्कयावर आले आहे. भारतात सिकलसेल गुणधर्म मुख्यतः आदिवासींमधे आढळतो. संशोधकांच्या पाहण्यात हे प्रमाण दोन टक्क्यांपासून वीस टक्क्यांपर्यंत आहे. काही गोंड जातींमधे सिकल सेल जीन वीस टक्के या प्रमाणात आढळते. दलित किंवा हरिजन हिंदूंमधे सिकल सेलचे प्रमाण बरेच आहे. सवर्ण हिंदूंमधे मात्र हा आजार नाहीच असे म्हणायला हरकत नाही. आदिवासी आणि दलितांमधे अनुवांशिकता - शास्त्राच्या दृष्टीने हे मोठेच साम्य

४८ / नराचा नारायण