पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

याचा फायदा घेण्यासाठीच की काय, काही मासे धोका जाणवला की, पाणी पिऊन शरीर तट्ट फुगवतात. आणि धोका टळला असे वाटल्यावर पाणी थुंकून टाकून पहिल्यासारखे लहान होतात. बरेच छोटे पक्षी घुबडाच्या चेहन्याला घाबरतात, मुख्यतः त्याच्या मोठ्या गोल डोळ्यांना घाबरतात. नुसत्या कागदावर दोन सारखे गोल शेजारी काढून त्यांच्यासमोर धरले तरीसुद्धा घाबरतात. काही फुलपाखरांच्या पंखांवर नुसते दोन मोठे पोकळ गोल असतात. त्यांचा उपयोग भक्षक पक्ष्यांना बागुलबोवा दाखवण्याकरताच होत असणार. एका फुलपाखराच्या पंखांच्या मागच्या टोकाला खोटे डोके, खोटे डोळे, खोट्या मिशा असतात. त्यामुळे भक्षक फसतात आणि फुलपाखरू वाचते. बहुधा भक्षक फुलपाखराच्या 'पाठीमागून' जाण्याचा प्रयत्न करीत असतील आणि त्यांना पाहून फुलपाखरू टाटा करीत उडून जात असेल. एक काजव्याच्या जातीत डोक्यावर एक पिशवी असते. ती सुसरीच्या डोक्यासारखी दिसते. खोटे डोळे, खोटे सुळेसुद्धा रंगवल्यासारखे दिसतात. ते पाहणान्याला भीती भीती वाटून त्या काजव्याचे संरक्षण होते.

 एका जातीच्या जीवाच्या गुणधर्मांचा दुसऱ्या जातीच्या जीवाने फायदा घेणे ही निसर्गातली एक अत्यंत सार्वत्रिक गोष्ट आहे. 'जीवो जीवस्य जीवनम् ' मधे हासुद्धा अर्थ गीतेला अभिप्रेत असेल का ? फूल आणि फुलपाखराचे नाते पाहून संवेदनाशील कविमनाला आल्हाद वाटतो. कुष्ठयोगी बाबा आमट्यांच्या शब्दांत सांगायचे म्हणजे मध चाखण्यात फुलपाखराचा विलास आहे, तर फुंलाचा विकास आहे. ही काव्यात्म मांडणी खूपशी लोभस आणि थोडीशी भावूक आहे. खरे पाहता विकास फुलपाख- राचाही होतो. शेवटी विलास म्हणजे तरी काय ? उपलब्ध साधनसंपत्तीचा अनावश्यक किंवा वावग्या गोष्टींसाठी अतिरेकी व्यय. माझ्या समजुतीने निसर्गात असा विलास नसतोच. सर्व सामग्री जीवरक्षण आणि जीवसंवर्धन यांवरच खर्च होते. आपण निसर्गातल्या या परस्पर संबंधांना सहविकास (कोइव्होल्यूशन) असा शब्द वाटल्यास वापरू शकू. पण या सहविकासासाठी परस्पर पूरकताच लागते असे नाही. विरोध- भक्तीसुद्धा चालते. स्वातंत्र्योत्तर काळात आपण डीडीटी वापरून डासांचा वंशसंहार केला. आज डीडीटीला दाद न देणारे डास वाढताहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून आपले शास्त्रज्ञ दुसरे अत्र शोधण्याच्या खटपटीत आहेत. पण त्यांना अजून यश आलेले

अनुरूपता / ४७