पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाली तर ? मग मरण टळणार, वंश वाढणार. असे गुणबदल निसर्गात दिसतात. पालीचे शेपूट, खेकड्याचे पाय हे लांब अवयव हल्लेखोराच्या तावडीत चटकन् सापडतात. पण त्यांचे काही सांधे सहज तुटण्यासारखे घडलेले असतात. त्या सांध्या- पाशी शेपूट किंवा पाय तुटतो. इतर भागांना इजा होत नाही. पुन्हा शेपूट वाढून तयार ! आहे की नाही जगण्याला अनुरूप रचना ?
 खुळखुळ्या साप (रॅटल स्नेक ) आपल्या शेपटीचे टोक हालवून खुळखुळ्या- सारखा आवाज करतो. त्या आवाजाला ( म्हणजे त्याने सूचित होणाऱ्या विषारी देशाला ) घाबरून प्राणी दूर राहतात. एक बिनविषारी सापही त्याची नक्कल करतो. त्या आवाजाचा त्याला स्वरक्षणासाठी उपयोग होतो.
 खेकड्यांच्या पाठीवर बरेचदा नक्षी असते. काही खेकड्यांची पाठ पाहिली, तर त्यात माणसाच्या चेहय्याचा भास होतो. जपानी समुद्रात सापडणान्या रुपयाच्या नाण्यायेवढ्या हाइके जातीच्या खेकड्याची पाठ जपानी सामुराई योद्धयाच्या चेहन्या- सारखी दिसते. म्हणून या खेकड्याच्या शरीरात सामुराई मृतात्मे वास करतात असा एक पारंपरिक जपानी समज आहे. त्यामुळे जपानी लोक या स्वेकडयांना खात नाहीत. त्यांची निरंकुश वाढ होते. माणसाची नक्कल केल्याचे निसर्गातील हे बहुधा एकमेव उदाहरण असावे. युरोपात एका जातीच्या कोळ्याच्या पाठीवर पांढरा ठिपका असतो. तो क्रूसासारखा दिसतो. म्हणून या कोळ्याला खिस्ती माणसांकडून बऱ्याच अंशी अभय मिळाले असावे. असे क्रूसधारी कोळी गुणबदलाने मुस्लिम देशातही निर्माण झाले असतील कदाचित. पण त्यांना खास संरक्षण मिळण्याचे काही कारण नाही.
 कोकिळा जगभर आपली अंडी इतर पक्ष्यांच्या घरट्यात घालतात अन् त्यांना फसवून त्यांच्याकडून आपले बालसंगोपनाचे काम करून घेतात. गंमत म्हणजे कोकिळेच्या अंडयाचा आकार आणि रंगसंगती, ज्या घरट्यात ते अंडे दत्तक दिले जाणार त्यातल्या अंड्यांप्रमाणे असते. एरवी दत्तक आईबाप परके दिसणारे अंडे घरट्यातून ढकलून देत असणार.

 काही कीटक वा त्यांच्या अळ्या पार्श्वभूमीमधे सहज मिसळून जातात. त्यांचे रंग आणि आकार, ते ज्या गवतावर, पानावर, काड्यांवर बसतात त्यांच्याशी अगदी

अनुरूपता / ४५