पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नकलाकार. या नकला तरी किती प्रकारच्या काजव्यांमधे समागमासाठी मादी नराला विशिष्ट प्रकारे प्रकाश पाडून आकर्षित करते. प्रत्येक जातीच्या काजव्यांचे संदेश वेगवेगळे असतात. काही काजव्यांच्या माद्या भुकेच्या वेळी भलत्याच जातीच्या काजव्यांसारखे संदेश देतात आणि हा परजातीचा नर जवळ आला की त्याला खाऊन टाकतात. ऑर्किड या जातीच्या फुलांचा डार्विनने फार काळजीपूर्वक अभ्यास केला. त्याला असे आढळले की, त्यांच्याकडे कीटक आकर्षित होण्याचे एक कारण म्हणजे यातल्या काही जातींमधे फुलाचा आकार कीटकाच्या मादीच्या शरीरासारखा असतो. नर कीटक त्या फुलावर बसून समागम क्रिया करतो आणि समाधानपूर्वक निघून जाताना बरोबर त्या फुलाचे बरेच परागकण नेतो. आता लक्षात घ्या की हा कीटक भलत्याच जातीच्या दुसऱ्या आर्किड फुलावर बसला आणि तिथे हे परागकण टाकून आला तर उपयोग काय ? म्हणजे हा कीटक एका विशिष्ट जातीच्या ऑर्किड- वरच बसायला हवा. हे कसे घडते ? तर त्या कीटकाला आपल्या मादीसारखी म्हणून दिसणारी जी जी फुले असतात ती सर्व एकाच जातीची असतात आणि ती त्या विशिष्ट जातीच्या कीटकालाच आकर्षून घेतात. म्हणजे तो कीटक आणि ते फूल यांचे शतजन्माचे नाते तयार होते. म्हणजे तो कीटक संपला तर ते फूलही संपणार.
 आपल्या परागकणांचे वितरण आपल्याच जातीच्या फुलांवर व्हावे, यासाठी इतरही उपाय असतात. फुलांची रचना अशी घडवून आणायची की, एका विशिष्ट जातीच्या कीटकालाच त्यातला मध खाता येईल. या दिशेने विचार करताना, डार्विनच्या नजरे- समोर स्टार ऑर्किड नावाची जात आली. या फुलातला मध खायचा, तर त्याच्या पाकळ्यांवर बसणाऱ्या कीटकाला फूटभर लांब जीभ हवी. डार्विनला खात्री होती की, आपण असे म्हणालो तर लोक आपली टर उडवणार. आणि झाले तसेच. पण अहो भाश्वर्यम्. आफ्रिकेजवळच्या मादागास्कर बेटावरून आलेल्या एका मिशनरी निरीक्षकाने बातमी आणली की, तिथल्या स्टार ऑर्किड फुलांवर बसून मध खाणारा फूटभर लांब जीभ असलेला किडा त्याने पाहिला आणि अभ्यासला आहे.

 प्राण्यावर हल्ला झाला, तर बरेचदा तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो. निसटताना अर्धत्रट फटका बसला, तर हातपाय अधू होतो, प्रसंगी तुटतो. असा अधू जीव स्वतःचे रक्षण नीट करू शकत नाही. पण समजा, तुटलेला अवयव पुन्हा वाढण्याची सोय

४४ / नराचा नारायण