पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण चौथे


अनुरूपता


 आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या जीवांची वंशवृद्धी होते, तर त्या परिस्थितीला तोंड न देऊ शकणारे जीव नष्ट होतात हे म्हणायला सोपे आहे. पण या प्रक्रियेची फलनिष्पत्ती म्हणून काय काय घडते हे बघायला लागल्यावर मती गुंग होते. अन्न मिळवणे, शरीर जिवंत ठेवणे आणि पुनरुत्पत्ती करणे या तीन महत्त्वाच्या क्षेत्रांत निसर्गामधे दिसणारा हुन्नरीपणा, कौशल्य थक्क करून टाकणारी आहेत.

 अन्न मिळवण्यासाठी शिकार करणाऱ्या प्राण्यांजवळ नखे, दात, चपळ शरीर, ताकदवान पंजे आणि जबडा अशी सामग्री असते. त्यांचे पोटही मांसाहार पचवण्या- साठी योग्य असेच असते. त्यांचे दात टोकदार असतात. उलट शाकाहारी प्राण्यांचे दात वनस्पती तोडून, रगडून, त्यांचा पचायला सोपा लगदा बनवण्याला सोयीस्कर असे असतात. गवत खाणाऱ्या प्राण्यांना आणखी एक अडचण असते. गवतात बरेचदा सिलिका हे द्रव्य असते. ते पचत नाही आणि विष्टेवाटे पडून जाते, पण चावताना

४० / नराचा नारायण