पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आपल्या बाळामधे असे अनुवांशिक दोष असू नयेत अशीच सगळ्या आईवडिलांची इच्छा असते. हे दोष फार क्वचित् घडतात. आपल्या घराण्यात असे अनुभव असतील, तर अनुवांशिकता विषयक तज्ञ डॉक्टरांजवळ मोकळेपणाने बोलून त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. क्वचित् मूल न होऊ देणेही श्रेयस्कर ठरते. अशा वेळी वाटल्यास मूल दत्तक घेता येईल. बरेचदा अनपेक्षितपणे, योगायोगाने असे दोष आपल्या बालकाच्या वाटयाला येतात. पण आधुनिक काळात खूप काळजी घेऊन अशा अपस्याचे जीवन सुसह्य करता येते. काही वेळा आई-बापांच्या प्रयत्नांनी डॉक्टरांच्या अपेक्षेपेक्षाही जास्त चांगल्या तऱ्हेने बालकाचा विकास होऊ शकतो. अशी एक वाचनीय कहाणी सौ. विद्युल्लेखा अकलूजकर यांनी खानुभवातून सांगितली आहे. ( ' अक्षर दिवाळी ' १९८२ ).

घेवडे, घुंगुरटी आणि घोटाळे / ३९