पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असते. अल्बिनो अपत्य कधी होते ? आई, बाप दोघांजवळm जीन असेल तरचे ते शक्य आहे. दोघेही अल्बिनो असतील तर ते उघड दिसेल. दोघांजवळ Mm अशीच जोडी असेल ते स्वतः अल्बिनो नसतील पण त्यांचे अपत्य अल्बिनो होण्याची शक्यता २५% असेल. m जीन असलेल्या लोकांचे प्रमाण फार कमी असल्यामुळे दोघे पतिपत्नी Mm प्रकारचे असण्याची शक्यता फारच कमी असते. पण ही दोघे नात्यातली असली आणि त्यांच्या घराण्यात जीन असली तर मात्र ती जीन त्या दोघांकडे आली असणे बरेच शक्य असते. नात्यातल्या लग्नामध्ये अशा प्रकारच्या रिसेसिव्ह, लपलेल्या जीन्स अपत्याच्या वाट्याला येण्याची शक्यता खूप असते.म्हणूनच की, काय पुष्कळ समाजात जवळच्या नात्यात लग्न न करण्याची पद्धत दिसते. अर्थात हे सार्वत्रिक विधान नव्हे. अनेक समाजात मामेबहिणीशी लग्न करण्याची पद्धतही फार पुरातन आहे. अल्बिनो अपत्यांचा विषय संपवण्यापूर्वी एवढेच सांगायला हवे की, मेलॅनिन किती प्रमाणात बनवायचे हे अनेक जीन्स मिळून ठरवतात. m जीन ही त्यांना प्रतिबंध करते, तर M जीन त्यांना मोकळीक देते.
 मेंडेलची मांडणी एक जीन एका गुणधर्माला जबाबदार आहे अशा समजुतीबर आधारलेली होती. प्रत्यक्षात पुष्कळच जास्त गुंतागुंत असते. काही वेळा बऱ्याच जीन्सचा गट (पॉलिजीन) मिळून एक गुणधर्म ठरवतो. उदाहरणार्थ उंची. काही वेळा एकाच जीनचा परिणाम वेगवेगळ्या गुणधर्मात दिसतो. याला सिंड्रोम असा शब्द वापरतात. अशाच एका जीनमुळे सांधे नीट घडत नाहीत. मग हाताचा अंगठा हवा तसा वेडावाकडा जाऊ शकतो. खांदे एकमेकाच्या जवळ येऊ शकतात. बोटे एक- मेकात अडकवूनसुद्धा दोन्ही हात पाठीपर्यंत जाऊ शकतात. याला मार्फन सिंड्रोम असे नाव आहे.

 X व Y या लिंगभेद ठरवणाऱ्या रंगसूत्रांच्या संदर्भात अनेक घोटाळे होऊ शक- तात. हीमोफीलिया या रोगात रक्त लवकर गोठत नाही आणि म्हणून जखम झाल्यावर रक्तप्रवाह लवकर थांबत नाही. हीसुद्धा रिसेसिन्ह जीन आहे. पण x या रंगसूत्रांवर.स्त्रीला तिच्या दोन्ही x रंगसूत्रांवर अशी जीन फार क्वचित मिळते. म्हणून स्त्रियां- मधे हा प्रकार फारसा आढळत नाही. पण पुरुषाच्या Y रंगसूत्रांवर अशी जीन नसतेच. त्यामुळे त्याला आईकडून हीमोफीलिया आणणारी जीन मिळाली, तरी

घेवडे, घुंगुरटी आणि घोटाळे / ३७