पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशा अभ्यासाला सहकार्य द्यायला ती राजी होतील असे नाही. यावर इटलीमधल्या एका संशोधन संस्थेने नामी उपाय काढला. जुळ्या भावंडांना फुकट औषधोपचार. त्यांच्याकडे शेकडो आईबाप जुळी मुले घेऊन येतात आणि हवी ती माहिती खुशीने देतात.
 अगदी क्वचित जुळी भावंडे एकमेकांची शरीरे जोडलेल्या अवस्थेत जन्माला येतात. अशांना सयामीज ट्विन्स असे म्हणतात. याचे कारण एकोणिसाव्या शतकात साम (आता थायलँड ) मध्ये जन्मलेल्या अशा जुळ्यांना प्रदर्शनात ठेवून बार्नम नावाच्या हुन्नरी अमेरिकन माणसाने भरपूर पैसा आणि प्रसिद्धी मिळवली. अशा जुळ्यांची शरीरे वरवर जोडलेली असतील, तर शस्त्रक्रियेने वेगळी करता येतात. पण त्यांचे काही अवयव सामाईक असतील तर मात्र कंबख्ती होते. जुळी मुले होण्यामध्ये योगायोगाबरोबरच अनुवांशिकतेचाही भाग असू शकतो. एरवी जुळ्यांचे प्रमाण वेग- वेगळ्या देशांत सारखेच दिसले असते. पण अमेरिकेत जुळी हजारी ६-६, जपानमधे २-५ तर नायजेरियामध्ये ३९.९ होतात. तेव्हा ज्यांच्या घराण्यात पूर्वी जुळी जन्माला आली आहेत, त्यांना जुळी होण्याची शक्यता जास्त असे मानायला हरकत नाही.

 पेशींच्या केंद्रस्थानी रंगसूत्रे आणि जीन्स जोडीजोडीने असतात हे वर सांगितलेच आहे. माणसाच्या कातडीला रंग येतो तो मेलॅनिन नावाच्या द्रव्यामुळे हे द्रव्य बनवण्याचा हुकूम, बाराव्या रंगसूत्रावर टोकापासून लांबीचा तिसरा हिस्सा अंतरावर असणारी जीन देते. हिला M म्हणू. हिचा आणखी एक प्रकार (अॅलील ) असतो m. ही m जीन मेलॅनिन बनवण्याचा हुकूम द्यायला नेहमी विसरते, किंवा तिला तो देताच येत नाही. आपल्याजवळ MM किंवा Mm अशी जीन्सची जोडी असेल तर मेलॅनिन बनेल. (म्हणजेच M ही डॉमिनंट तर m ही रिसेसिव्ह जीन आहे ). पण आईकडून व बापाकडूनही m अशी mm जोडी मिळाली तर मेलॅनिन बनणारच नाही. मग ती व्यक्ती पांढरी होते. सावधान ! ज्याला कोड म्हणतात ( ल्युकोडर्मा ) ते हे नव्हे. या माणसांना अल्बिनो ( पांढरे) म्हणतात. यांचे केस मुक्या, कातडी सर्व पांढरे असते. यांना उन्हाचा त्रास होतो. या गुणबदलाचे प्रमाण वीस हजारात एक इतके कमी आहे. गुणबदलाने निर्माण झालेली जीन अनुवांशि- कतेने पुढच्या पिढीत जाते. पण रिसेसिव्ह असल्यामुळे ती बहुतेक वेळा लपलेली

३६ / नराचा नारायण