पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आले की, पेशींचे विभाजन होत असताना त्यांच्यावर रंग टाकला, तर पेशींच्या केंद्रभागी रंगीत धागे (क्रोमोसोम्स) दिसू लागतात. ते जोडीने असतात. त्यांच्या- मधेच अनुवंशिक गुणधर्म असणार असा तर्क सर्वांनी केला. माणसाच्या प्रत्येक पेशीमध्ये क्रोमोसोम्सच्या २३ जोड्या असतात तर फळांवर बसणान्या घुंगुरट्यामध्ये ४ जोड्या. वेगवेगळ्या जातीच्या गव्हाच्या पेशीत ७ पासून २६ पर्यंत रंगसूत्र जोड्या असतात. प्रत्येक जातीत, प्राण्यात हा आकडा ठरलेला असतो.
 सजीवांच्या शरीरातल्या जुन्या पेशी मरत असतात आणि नव्या सतत निर्माण होत असतात. पेशीचे विभाजन होऊन दोन पेशी बनण्यापूर्वी पेशीच्या केंद्रात प्रत्येक रंगसूत्राची एक जादा प्रत बनवली जाते. म्हणजेच रंगसूत्रांची संख्या दुप्पट होते. विभाजनाच्या वेळी रंगसूत्रे निम्मी निम्मी वाटली जातात आणि नव्या पेशी पहिल्या- सारख्याच घडतात. हे वर्णन शरीर पेशींना ( सोमॅटिक सेल्स) लागू आहे. शुक्रजंत् आणि अंडी या लैंगिक पेशी ( सेक्स सेल्स) मधे मात्र नियम वेगळा. नराचे शुक्र- जंतू बनताना रंगसूत्राच्या जोडीतील एक एका शुक्रजंतूला आणि दुसरा दुसन्या शुक्रजंतूला मिळतो. अशा प्रकारे रंगसूत्रांची संख्या निम्मी होते. अंड्यामध्येही अशीच निम्मी रंगसूत्रे असतात. शुक्रजंतू ने अंडयात प्रवेश केला की गर्भधारणा झाली. या गर्भामधे शुक्रजंतूकडून निम्मी अन् अंडयातून निम्मी रंगसूत्रे मिळून संख्या पुन्हा पुन्हा पहिल्यासारखी होते. अशा प्रकारे आई आणि बाप यांच्याकडून निम्मे निम्मे अनुवांशिक गुण मिळून अपत्याचा पूर्ण संच तयार होतो.

 आता प्रश्न म्हणजे प्राण्यांच्या एकाच जातीत फरक का ? याला एक उत्तर असे, की शरीरात लक्षावधी पेशींचे विभाजन होत असताना आणि रंगसूत्रांच्या प्रती तयार होत असताना क्वचित चुका होतात. शाळेत खेळ म्हणून मुलांना गुप्त निरोप कानात सांगायला सांगतात. पहिल्या मुलाने सांगितलेला निरोप आणि पंचविसाव्या मुलाने ऐकलेला निरोप यात इतका फरक असतो, की सर्वजण चकित होतात. या तुलनेने पेशींच्या वाढीमधे रंगसूत्रांच्या प्रती बनवताना फारच कभी चुका होतात. यांना म्युटेशन किंवा गुणबदल असे म्हणतात. शुक्रजंतू किंवा अंडे यांच्यातील रंग- सूत्रांमधे असा गुणबदल आला, तर त्यांच्यापासून बनणाऱ्या गर्भाच्या प्रत्येक पेशीत तो निर्माण होतो आणि मग प्राण्यात तो नवीन गुणधर्म दिसू लागतो. म्यूलर या

३२ / नराचा नारायण