पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

म्हणायचे. दुसन्याला माघार घ्यावी लागते. त्याला रिसेसिव्ह म्हणायचे. गुळगुळीतपणा डॉमिनंट आहे, तर सुरकुतलेपणा रिसेसिव्ह. म्हणून संकरित पिढीमधे प्रत्येक दाणा गुळगुळीत दिसतो. उंच आणि बुटक्या रोपांच्या संकरापासून सर्व उंचच रोपे मिळतात. या संकरित बियांजवळ एका जन्मदात्याकडून मिळालेला उंचपणा (T), तर दुसऱ्याकडून मिळालेला बुटकेपणा ( 1 ) असतो. आता दुसऱ्या पिढीत ( F2 ) Tt अशी रचना असलेले दोन जीव आपला एक एक गुणधर्म पिल्लाला देतात. यात TT ( दोघांनी उंचपणा दिला ), Tt ( पहिल्याने उंचपणा, तर दुसय्याने बुटकेपणा दिला ), tT आणि tt असे चार प्रकार संभवतात. पहिल्या तीन प्रकारांतून उंच रोप संभवते आणि चौथ्यातून बुटके अशा प्रकारे दुसऱ्या पिढीत ( F2 ), रिसेसिव्ह गुणधर्म चौथा हिस्सा रोपात सापडतो. T हाच हिशोब उंचपणा आणि गुळगुळीतपणा यांच्याबाबत. एकदम करता येईल. पहिल्या पिढीत (F1 ) सर्व रोपांना. Rr Tt . असे गुण मिळाले ( R म्हणजे राउंड- गुळगुळीत, म्हणजे सुरकुतलेला) आणि सर्व रोपे उंच अन् गुळगुळित बियांची निघाली. दुसऱ्या पिढीत एकंदर सोळा वेगवेगळ्या शक्यता आहेत. त्या पुढीलप्रमाणे १ ) RT RT, २ ) RT Rt, ३) RT 1T, ४) RT rt,५ ) rT RT, ६) rT Rt ७) rT rT, ८) rT_rt, ९ ) RtRT, १० ) Rt Rt, ११) Rt rT, १२) Rt rt १३ ) rt RT, १४) rt Rt, १५ ) rt rT, १६ ) rt rt, यातल्या १, २, ३, ४, ५ ६, ९, ११, १३ या नऊ रोपांमध्ये उंचपणा आणि गुळगुळीतपणा दोन्ही दिसतील. ७, ८, १५ ही रोपे सुरकुतलेली उंच या प्रकारची, १०, १२, १४ ही रोपे बुटकी गुळगुळीत या प्रकारची अन् १६ वा प्रकार बुटकी सुरकुतलेली असेल. हेच ते प्रसिद्ध ९ : ३ : ३ : १ प्रमाण. दुर्दैवाने मेंडेलच्या अभ्यासाचे महत्त्व त्याच्या हयातीत कोणाच्या लक्षात आले नाही. १९०० साली तीन युरोपीय शास्त्रज्ञांच्या वाचनात ३५ वर्षांपूर्वीचे मेंडेलचे लिखाण आले आणि त्यांनी धूळ खात पडलेल्या या कल्पना अडगळीतून काढून जगासमोर मांडल्या. त्यानंतर मात्र अनुवांशिकता शास्त्राची सतत प्रगती होत गेली. याच काळात कोलटारपासून रंग बनवण्याचे तंत्र सापडलेले होते. जीवशास्त्रज्ञ. या रंगांचा आपल्या अभ्यासात कुठे उपयोग होईल असा शोध घेत होते. असे लक्षात aas, घुंगुरटी आणि घोटाळे / ३१